आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची दुरुस्ती रविवारीच, गाड्यांना उशीर झाल्यास प्रवाशांना माेफत जेवण- पीयूष गोयल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी काळात विकेंडला रेल्वे प्रवास जरा जपूनच करा. रेल्वे विभागाकडून देखभाल-दुरुस्तीची मोठी कामे रविवारीच केली जाणार आहेत. हा निर्णय सर्व विभागांना लागू राहील. दुपारी भाेजनाच्या वेळी रेल्वे उशिरा धावत असल्यास आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भोजन व पिण्याचे पाणी मोफत दिले जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले.

 

रेल्वे उशिरा धावत असल्यास प्रवाशांना एसएमएस व जाहिरातीद्वारे माहिती देण्यात येईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...