आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात पाऊसमान ९ %नी घटले, दक्षिणेत जोरदार, उत्तरेत दुष्काळ; १४ राज्यांत दुष्काळसदृश स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र मुंबईचे आहे. मंगळवारी मोसमातील सर्वात जास्त पाऊस झाला. सुमारे ८३ टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली. - Divya Marathi
छायाचित्र मुंबईचे आहे. मंगळवारी मोसमातील सर्वात जास्त पाऊस झाला. सुमारे ८३ टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली.

नवी दिल्ली- आतापर्यंतचा मान्सून अपेक्षेपेक्षा निश्चितपणे विपरीत राहिला. पंधरा दिवस अाधी संपूर्ण देशाला व्यापले तरी देशात ९ टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. देशातील १२ राज्यांत सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, छत्तीसगडमध्ये पावसाने सर्वाधिक आेढ दिली आहे. त्याचा फटका खरिपाच्या पिकांना बसला आहे. 


गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत १४ टक्क्यांनी कमी पेरा झाला आहे. धान व कपाशीवर त्याचा परिणाम झाला आहे. भात उत्पादनाचेही नुकसान होणार आहे. पश्चिम बंगाल, आेडिशा व छत्तीसगडमध्ये कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र, दक्षिणेकडील राज्यांत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथे पावसाने हुलकावणी दिली आहे. सौराष्ट्र व कच्छमध्ये आतापर्यंत ६० टक्क्यांहून कमी पाऊस झाला. 


जुलैत आतापर्यंत १६ % कमी   
आतापर्यंत जुलैच्या सुरुवातीच्या १० दिवसांत पाऊस १६ टक्क्यांनी कमी झाला. मात्र, देशभराचा विचार केल्यास सरासरी पाऊसमान चांगले असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. जुलैमध्ये १ टक्का जास्त पाऊस अपेक्षित आहे.  


ईशान्येत सरासरीहून कमी पाऊस  
जूनमध्ये पावसाने त्रिपुरा, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराममध्ये पुराने थैमान घातले होते. या राज्यांत पुरात ५० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूरमध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला.  


बंगालच्या खाडीत शांतता असल्याने मान्सून सुस्तावलेला
भारतीय हवामान विभागाच्या मते बंगालच्या खाडीतील प्रदेशातील हालचाली मंदावलेल्या आहेत. जूनपासून आतापर्यंत कमी दाब आहे. वास्तविक या कालावधीत किमान चार वेळा असा पॅटर्न तयार होतो. 

बातम्या आणखी आहेत...