आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; १० गावांत पूर, दाेघांचा मृत्यू; १७ राज्यांत मुसळधार पावसाची चिन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हवामान विभागाने साेमवारी या अाठवड्यात १७ राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस हाेण्याचा इशारा दिला. विभागानुसार यंदा मान्सूनने १७ दिवस अाधीच संपूर्ण देश व्यापून टाकला अाहे. मान्सून सध्या खूप सक्रिय असून, जम्मू-काश्मीर, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, अासाम व गुजरातसह १७ राज्यांत काही ठिकाणी अाणि पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार व मेघालयातील काही भागांत अतिपावसाची शक्यता व्यक्त केली अाहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश व अरुणाचल प्रदेशातही पावसाची भविष्यवाणी केली अाहे. देशात अातापर्यंत सरासरीपेक्षा ७ % कमी पाऊस झाला अाहे. 


केदारनाथ यात्रेवरही परिणाम; राज्याच्या १० जिल्ह्यांत अलर्ट...
पिथोरागड | वरिल छायाचित्र उत्तराखंडातील पिथोरागडचे अाहे. साेमवारी सकाळी ढगफुटीमुळे पिथोरागडच्या मुनसियारीत माेठा पूर अाला. जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक घरे-इमारती खचल्या अाहेत. पुरामुळे अनेक रस्ते व पूलदेखील वाहून गेले. अनेक ठिकाणी रस्ते माेठ्या प्रमाणात चिखलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून, मुसळधार पावसामुळे दाेन जणांचा मृत्यू झाला अाहे. पावसामुळे केदारनाथ व मानसराेवर यात्रेवरही परिणाम झाला असून, १० जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे. 

 

अाजची भविष्यवाणी 
अासाम व मेघालयातील काही भागांत अतिप्रमाणात पाऊस हाेईल. पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम व बिहारमध्ये माेठ्या प्रमाणात पावसाची चिन्हे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, झारखंडच्याही काही भागांत मुसळधार पाऊस हाेईल.