आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य होणार निवृत्त, जेटलींनाही यावे लागणार पुन्हा निवडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्यसभेतील चेहरे बदलणार आहेत. सभागृहाचे ग्लॅमर समजले जाणारे अनेक चेहरे संसदेमध्ये दिसणार नाहीत. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या स्टार्समध्ये रेखा आणि जया बच्चन, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि हॉकीच्या मैदानातून बीजू जनता दलाचे खासदार बनलेले दिलीप टिर्की यांचा सहभाग आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर फक्त ग्लॅमर क्षेत्रातील नव्हे तर अनेक राजकीय चेहऱ्यांनाही अलविदा केले जाईल. 


जेटली-प्रसाद यांच्यासह अनेक मंत्र्यांना पुन्हा निवडून यावे लागणार 
- पॉइंट ऑर्डरसाठी प्रसिद्ध झालेले सपाचे नरेश अग्रवाल आणि काँग्रेसचे राजीव शुक्ला सत्ताधारी दलाकडून हल्ल्याची कमान सांभाळणारे भूपेंद्र यादव, कांग्रेसच्या रेणुका चौधरी, कायद्याच्या डावपेचांसाठी प्रसिद्ध अभिषेक मनु सिंघवी आणि हाजर जबाबीपणासाठी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले प्रमोद तिवारीही राज्यसभेला अलविदा करतील. 
- भाजपकडून विरोधकांना जशास तसे उत्तर देणारे पुरुषोत्तम रुपाला आणि विनय कटियार यांचा कार्यकाळही एप्रिलमध्येच समाप्त होत आहे. 
- त्याशिवाय अरुण जेटली, जेपी नड्‌डा आणि रविशंकर प्रसाद अशा केंद्रीय मंत्र्यांनाही पुन्हा निवडून यावे लागणार आहे. 

 

सचिन तेंडुलकर
- 27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही. 
- 22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली. 

 

रेखा
27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या. 

 

जया बच्चन

सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. 
- त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले. 

 

कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त 

 

भाजप 17
काँग्रेस 11
सपा 06
राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती 03
तृणमूल काँग्रेस 03
बीजेडी 02
जदयू 02
राष्ट्रवादी काँग्रेस 02
माकप 01
बसप 01
अपक्ष 01
शिवसेना 01
टीडीपी 02

 

 

बीजेपी 17
कांग्रेस 11
सपा 06
मनोनीत 03
तृणमूल कांग्रेस 03
बीजेडी 02
जेडीयू 02
एनसीपी 02
सीपीएम 01
बसपा 01
निर्दलीय 01
शिव सेना 01
टीडीपी

02

 

 

बातम्या आणखी आहेत...