आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार न्यायमूर्तींच्‍या नाराजीनंतर सुप्रीम कोर्टातील खटल्यांच्या वाटपात राेस्टर पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खटल्यांच्या वाटपावरून चार न्यायमूर्तींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर सुप्रीम कोर्टातील खटल्यांच्या वाटपाची पद्धत बदलण्यात आली आहे. यानुसार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी यात रोस्टर पद्धत लागू केली असून कोणते न्यायमूर्ती कोणत्या विषयाच्या खटल्याची सुनावणी करतील, हे यात निश्चित केले.


आजवर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने खटल्यांचे वाटप होत होते. दरम्यान, ही व्यवस्था म्हणजे सरन्यायाधीशांविरुद्ध बंड करणाऱ्या चार न्यायमूर्तींना दणका मानला जात आहे. आता सर्व जनहित याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश करतील. घटनापीठात कोणाचा समावेश करायचा तो अधिकारही सरन्यायाधीशांचाच असेल. या पद्धतीमुळे कोणता विषय कोणत्या पीठासमोर जाणार हे स्पष्ट असेल. त्यामुळे व्यवस्था पारदर्शक होईल.

 

४ न्यायमूर्तींची जाहीर नाराजी ठरले कारण
१२ जानेवारीला न्या. जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर व कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश मिश्रा यांच्यावर खटल्यांच्या वाटपात भेदभाव केल्याचा आरोप केला होता. घटनापीठात पहिले पाच ज्येष्ठ न्यायमूर्ती असावेत, अशी त्यांची मागणी होती.

बातम्या आणखी आहेत...