आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या चरित्र, आचरणामध्ये आणीबाणीचे डीएनए : भाजप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आणीबाणीच्या ४३ व्या स्मृतिदिनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने भलेही या कृतीसाठी क्षमा मागितली असली तरी काँग्रेसचे चरित्र व आचरणातच आणीबाणीचा डीएनए आहे. अजूनही तो दिसून येतो, अशी टीका केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी केली. 


भाजपने मुख्यालयात मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. रविशंकर प्रसाद म्हणाले, आणीबाणीची ४३ वर्षे उलटून गेली आहेत. पण काँग्रेसच्या स्वभावात काही फरक पडला आहे का ? काँग्रेसने त्या कृतीसाठी भले एकदा माफी मागितली होती. परंतु काँग्रेसचे वागणे मुळीच बदललेले नाही. काँग्रेसचा पराभव होतो. लष्कर प्रमुखांवर टीका केली जाते. मुख्य निवडणूक आयुक्तांना लक्ष्य केले जाते. न्यायपालिकेशी असलेले त्यांचे संबंध धमकी देणारे आहेत. २०१९ पूर्वी राम मंदिराबाबत सुनावणी केली जाऊ नये, असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. त्यावरून काँग्रेसचे हेतू लक्षात येऊ शकतात, असे प्रसान म्हणाले. 


जखमा ४३ वर्षांनंतरही ताज्या 
काँग्रेसचे वागणे अद्यापही बदललेले नाही. आणीबाणीच्या घटनेला चार दशके उलटून गेलेले आहेत. ४३ वर्षांनंतरही त्यांच्या वागण्यात काहीही बदल नाही. तेव्हाही काँग्रेसने इंदिरा गांधी यांना वाचवण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणीत संविधानात अनेक दुरुस्त्या करून इंदिरा गांधींचा बचाव करण्यात आला होता. काँग्रेसमध्ये घराणेशाही बद्दलची निष्ठा चरम सीमेवर पोहोचली होती. तेव्हा सुवर्ण सिंह, जगजीवन राम इत्यादी मोठ्या नेत्यांना देखील गप्प करण्यात आले. 


'चापलुसी संस्कृती वाढली होती' : आणीबाणीच्या काळात देशात चापलुसी संस्कृती निर्माण करण्यात आली व त्याचे नेतृत्व तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी केले होते. त्याला अनुशासन पर्व असे नाव देण्यात आले होते. जनतेवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार होती. तेव्हा कोणालाही अपील, वकील व बाजू मांडण्याचा अधिकार नव्हता. आणीबाणीत वृत्तपत्रांचा आवाज दडपण्यात आला होता. 

 

इंदिराजींचा अपमान हा देशातील ६० कोटी महिलांचा अपमान : गहलोत 
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करू लागले आहे. त्याचे अनेक पुरावे प्रसारमाध्यमातून येत आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचा अपमान हा देेशातील ६० कोटी महिलांचा अपमान आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. इंदिरा गांंधी यांच्याविषयी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्याचा या माध्यमातून काँग्रेसने समाचार घेतला आहे. मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करू लागले आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा व घनश्याम तिवाडी यांच्या वक्तव्यांवरून ते स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला. जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...