आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari : रजिस्टर मध्ये लिहिलेल्या होत्या मोक्षप्राप्तीसाठी नेमके काय करायचे याच्या Steps

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुरारी येथील घटनेमध्ये पोलिस तपासात समोर आलेल्या बाबींनंतर ही घटना सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय बळावत आहे. काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत असले तरी, तपासात सापडलेल्या काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या वाटत आहे. 

 

पोलिसांना सापडलेल्या पुराव्यांमध्ये प्रामुख्याने एका रजिस्टरचा समावेश आहे. या रजिस्टरवर काही धार्मिक बाबी आणि विधी लिहिलेल्या होत्या. या रजिस्टरवर मोक्षप्राप्तीचा उल्लेख असल्याचीही माहिती काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. या रजिस्टरमध्ये मोक्षप्राप्तीसाठी काही स्टेप्सचा उल्लेख केलेला आहे. या सर्वांचा विचार करता त्यांचा आत्महत्येची जी पद्धत आहे, त्याच्याशी संबंध जाणवतो. ज्या अवस्थेत मृतदेह सापडले तसाच काहीसा उल्लेख या रजिस्टरवर केलेले पाहायला मिळत आहे. 

 

रजिस्टरवर लिहिलेल्या मजकुराता मोक्षप्राप्तीसाठीच्या मार्गाचा उल्लेख किंवा मोक्षप्राप्तीसाठी नेमके काय करायला हवे याच्या स्टेप्सचा उल्लेख खालीलप्रमाणे असल्याचे समोर येत आहे..
>> हा विधी मध्यरात्र आणि रात्री 1 वाजेच्या दरम्यान करायला हवा 
>> डोळे आणि तोंड बद करून किंवा झाकून तुमच्या मनातील भितीवर नियंत्रण मिळवा 
>> डोळ्याच्या भोवती सुरक्षितपणे पट्टी बांधा 
>> हात बांधण्यासाठी दोरीचा वापर करा 
>> डोळे झाकलेले किंवा बंद असतील याची खात्री करा 
>> गुरुवार किंवा शनिवारची रात्र निवडा, मंद प्रकाश असायला हवा 
>> कॉटनची ओढणी किंवा साडीचा दोरी म्हणून वापर करा 
>> फास तयार करता येईल एवढी मोठी दोरी किंवा ओढणी असावी 
>> जर आई याठिकाणी उभी राहू शकत नसेल, तर ती दुसऱ्या खोलीत झोपू शकते 
>> या माध्यमातून आपण देवाला भेटण्यासाठी जाणार आहोत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...