आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक सोहळा अव्वल, राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला प्रथम क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळाले आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारम यांनी याची घोषणा केली आहे. 

- कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ शुक्रवारी राजपथावर उतरला होता. कवी भूषण यांचे काव्य अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले होते.
- प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून चित्ररथ तयार करण्यात आला होता. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी चित्ररथ तयार केला होता. 
 
संभाजी महाराजांनी दिली होती माहिती
राज्यसभा सदस्य संभाजी महाराजांनी शनिवारी सोलापूर येथील 'दिव्य मराठी' कार्यालयास भेट दिली. तितक्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा संभाजी महाराजांना फोन आला आणि ही बातमी कळाली. यासंदर्भात रविवारी अधिकृत घोषणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...