आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीत इंदिरा गांधी यांची भूमिका हिटलरसारखी : अरुण जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला ४३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मन हुकूमशहा अॅडोल्फ हिटलरशी केली आहे. फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आणीबाणीत इंदिरा गांधी यांची भूमिका हिटलर यांच्या कार्यशैलीसमान होती. 


जेटलींनी म्हटले आहे की, काही बाबतीत इंदिरा गांधी यांनी केलेली कामे हिटलरनेही केलेली नव्हती. त्यांनी लोकशाहीस घराणेशाहीत बदलले. हिटलर व इंदिरा यांनी कधीही घटना मानली नाही. दोघांनी लोकशाहीस हुकूमशाहीत बदलले. हिटलरने संसदेतील बहुतांश विरोधी पक्षनेत्यांना अटक केली व संसदेतील अल्पमतातील सरकारला दोन तृतीयांश बहुमताच्या सरकारमध्ये रूपांतरित केले. घटनादुरुस्तीच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह तरतुदी मंजूर केल्या. त्यांनी संसदीय कामकाज प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित करण्यासही बंदी घातली होती. हे तर हिटलरनेही केले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...