आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेटरसायकलवर मागे बसणाऱ्यांसाठी सेफ्टी हँडल,साइड गार्ड बंधनकारक - न्यायालय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने रस्ते सुरक्षेबाबत शुक्रवारी माेटरसायकलस्वारांसाठी काही नियम सक्तीचे केले. कोर्टाने सेंट्रल व्हेइकल मोटार रूल १२३ च्या कठोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले. नियमानुसार माेटरसायकलवर मागे बसलेल्या प्रवाशासाठी सेफ्टी हँडल, फुट रेस्ट व मागील चाकात काही अडकू नये म्हणून साइड गार्ड लावणे बंधनकारक आहे. नव्या गाड्यांना हा आदेश लागू राहील. 


वाहन कंपन्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्सची (सियाम) याचिका फेटाळत कोर्टाने हे आदेश दिले. याचिकेत मध्य प्रदेश हायकोर्टाच्या नोव्हेंबर २००८ मधील निकालाला आव्हान दिले होते. हायकोर्टाने ज्ञानप्रकाश यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आदेशात सेंट्रल व्हेइकल रूल १२३ चे पालन सक्तीचे केले होते. सियामने त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले होते. ज्ञानप्रकाश यांनी सांगितले की, बहुतांश वाहन कंपन्या ३ दशकांपासून हे नियम पाळत नाहीत. यामुळे माेटरसायकल अपघात वाढले आहेत.

 

दुचाकी कंपन्यांना फटका 

- परदेशातून आयात माेटरसायकल असेंबल करणाऱ्या वाहन कंपन्यांना या आदेशाचा सर्वाधिक फटका बसेल. 
- अनेक देशांत साडी गार्ड किंवा अशा प्रकारचे सेफ्टी फीचरचे नियम नाहीत. 
- मागील प्रवाशाच्या सुरक्षेकरता सीटच्या मध्यभागी ग्रीप हँडल बसवण्यासाठी दुचाकीत अनेक बदल करावे लागतील. 
- तथापि, देशात निर्मित, आयातीत दुचाकींत आधीच साडी गार्ड असतात. 
- मात्र मागील चाकावर उजवीकडच्या बाजूला जाळी बसवण्यासाठी दुचाकी कंपन्यांना अनेक बदल करावे लागतील.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारत @२०१६: दुचाकी अपघातात ४४ हजार ठार...
बातम्या आणखी आहेत...