आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच प्रकरणात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुन्हेगारी प्रकरणात एफआयआर रद्द झाल्यानंतर त्या प्रकरणात नवीन तथ्य समोर आले तर दुसऱ्यांदा एफआयआर दाखल होऊ शकते, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला. 


सुप्रीम कोर्टाचे न्या. एन.व्ही रमणा व एम. शंतनागौदार यांच्या पीठाने पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाला रद्द ठरवत वरील निर्वाळा दिला. सिवान येथील डॉ. ईरा सिन्हा यांनी ३० मे २००६ रोजी ७ लाखांमध्ये बायोकेमस्ट्री अॅनालायझर मशीन खरेदी केले. याच्या देखभालीसाठी वार्षिक २० हजार रुपये दिले. पण मशीन व्यवस्थित चालत नव्हती. कंपनीने मशीन बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे २४ मार्च २००८ मध्ये ईरा यांनी एफआयआर नोंदवला होता. 

बातम्या आणखी आहेत...