आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे डाेकलाममध्ये सात हेलिपॅड, रणगाडेही तैनात; उपग्रह छायाचित्रांद्वारे दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- उपग्रह छायाचित्रांवर अाधारित जारी केलेल्या काही प्रसारमाध्यम अहवालांनुसार चीनने डाेकलामच्या उत्तर भागात ७ हेलिपॅड तयार केले अाहेत. तसेच तेथे जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रणगाडे, शस्त्रे असलेली वाहने, दारूगाेळ्यासह सैन्य दलाशी संबंधित अनेक उपकरणे अाढळून अाली अाहेत. चीन तेथून पुढे रस्ता बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी बुधवारी ‘रायसिना संवाद’ कार्यक्रमात सांगितले की, उत्तर डाेकलाममध्ये चिनी सैनिक तैनात अाहेत; परंतु त्यांची संख्या खूप माेठी नाही. थंडीमुळे ते तेथून अापली यंत्रसामग्री व इतर उपकरणे घेऊन गेले नसावेत. तसेच भारतीय सैन्यदेखील तेथे तैनात अाहे. चीनचे सैनिक पुन्हा तेथे अाल्यास भारतीय सैन्य दल त्यांचा सर्व शक्तिनिशी सामना करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


डाेकलाम वादानंतर दाेन्ही देशांतील तणाव झाला कमी
या वेळी लष्करप्रमुख रावत यांनी दाेन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांचीही माहिती दिली. सीमेवर दाेन्ही देशांतील सैन्य दलांमध्ये सातत्याने चर्चा सुरू अाहे. तसेच अाम्ही वैयक्तिक स्तरावर बैठका घेणे सुरू केले असून, कमांडर्समध्येही संवाद हाेत अाहे. त्यामुळे दाेन्ही देशांचे संबंध पूर्वीसारखे झाले अाहेत, असेही त्यांनी सांगितले. डाेकलाममध्ये भारत व चीनचे सैन्य ७३ दिवसांपर्यंत समाेरासमाेर हाेते. हा वाद २८ अाॅगस्ट २०१७ राेजी शमला.


चीन बनवताेय १० किमी परिसरात सैन्य शिबिर
प्रसारमाध्यमांच्या या अहवालात म्हयले अाहे की, उत्तर डाेकलाम भागात चीन पुन्हा एकदा सैन्य शिबिरांची निर्मिती करत अाहे. या भागात रस्ता बनवण्याचा यामागे उद्देश अाहे; जेणेकरून या भागापर्यंत सहजपणे पाेहाेचता यावे. चीन कशा प्रकारे वादग्रस्त भागात सैन्य शिबिर बनवत अाहे, हे नवीन उपग्रह छायाचित्रांत स्पष्टपणे दिसून येतेय. ज्या भागावर भूतान अापला दावा करताेय, तेथेच चीनकडून हे काम सुरू अाहे. हा संपूर्ण भाग १० किमी अंतराचा अाहे. 


अाठवडाभरात शेजाऱ्यांना चाैथ्यांदा इशारा
१२ जानेवारी :
चीन ताकदवान देश असेल; परंतु भारत  कमकुवत नाही. अामच्या सीमेवर काेणत्याही स्थितीत कुणाचे अतिक्रमण हाेऊ देणार नाही.

१४ जानेवारी : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य अभियानाला वेग देण्याची गरज. सीमेपलीकडून हाेणारा दहशतवाद राेखण्यासाठी पाकवर दबाव वाढवला जाऊ शकताे.

१५ जानेवारी : पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे बंद न केल्यास भारत दुसरा पर्याय स्वीकारेल, भारतीय सैन्य काेणत्याही स्थितीत प्रत्युत्तर देण्यास सक्षम अाहे.

बातम्या आणखी आहेत...