आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेशल्सने भारताला पुन्हा दिली नाैदलतळ उभारण्यासाठी मंजुरी; सुरक्षा, संरक्षण, जलवायूसह सहा करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फाउरे हे सध्या भारत दाैऱ्यावर अाहेत. साेमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींची भेट घेतली व त्यानंतर भारतास अापल्या जमिनीवर नाैदलतळ बनवण्यास पुन्हा मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वी सेशल्सने तीन वर्षे जुना करार रद्द करण्याची घाेषणा केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही मंजुरी विशेष महत्त्वाची ठरणार अाहे. त्यामुळे अाता त्याची चिंता संपुष्टात अाली अाहे. 


फाउरेंशी चर्चा केल्यानंतर माेदी म्हणाले की, दाेन्ही देश परस्परांच्या अधिकारांच्या मान्यतेअाधारे एझम्पशन बेट प्रकल्पावर साेबत काम करण्यास सहमत झाले अाहेत व भारत लाेकशाहीच्या मूळ सिद्धांतांचा सन्मान करताे व हिंद महासागरात शांतता, सुरक्षा व स्थैर्य कायम ठेवण्यास कटिबद्ध अाहे. त्यावर सेशल्सचे राष्ट्रपती फाउरे म्हणाले की, एझम्पशन बेटावर दाेन्ही देश एकमेकांचे हित लक्षात घेऊन एकत्रपणे काम करतील. दरम्यान, एका अाठवड्यापूर्वी फाउरे यांनी सेशल्समधील प्रसारमाध्यमांना भारत दाैऱ्यावर जाईन तेव्हा मी माेदींशी या प्रकल्पावर चर्चा करणार नाही; सेशल्सकडून पुढील वर्षी स्वत:च्या पैशांनी सैन्यतळाची निर्मिती केली जाईल, असे सांगितले हाेते. अशा स्थितीत सेशल्सने मंजुरी देण्याचा घेतलेला निर्णय, हे भारताच्या कूटनीतीच्या प्रयत्नांचे माेठे यश मानले जात अाहे. 


काेसळलेल्या सुरक्षारक्षकाची माेदींनी केली विचारपूस 
पीएम माेदी हे साेमवारी सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फाउरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात उपस्थित हाेते. यादरम्यान उकाडा व तीव्र उन्हामुळे भारतीय हवाई दलाच्या (अायएफ) एका सुरक्षारक्षकाची तब्येत अचानक बिघडली व ताे गार्ड अाॅफ अाॅनर समारंभातच काेसळला. ते पाहून माेदी यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती घेऊन विचारपूस केली. या समारंभात राष्ट्रपती रामनाथ काेविंद हेही उपस्थित हाेते. दरम्यान, फाउरे यांनी माेदींव्यतिरिक्त परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही चर्चा केली.

 
भारत प्रकल्पावर खर्च करताेय ३,७४७ काेटी रुपये 
एझम्पशन हे बेट सेशल्सची राजधानी व्हिक्टाेरियापासून १,१३५ किमी दूर दक्षिण-पश्चिम भागात असून, ११.६ किमी परिसरात पसरलेले अाहे. याची सागरी सीमा १७ किमी असून, २०१५मध्ये या बेटावर लष्करी तळ बनवण्याबाबत भारत-सेशल्सदरम्यान करार झाला हाेता. मात्र, सेशल्समध्ये विराेधी पक्षांनी अांदाेलन केल्याने सरकारने हा करार रद्द करण्याची घाेषणा केली हाेती. भारताने २०१६मध्ये तेथे काेस्ट सर्व्हिलन्स सिस्टिम स्थापन केली. भारत या प्रकल्पावर ३,७४७ काेटी खर्च करताेय. 


भारत देणार ६८१ काेटींचे कर्ज 
भारत व सेशल्सदरम्यान ६ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात अाल्या. त्यात सुरक्षा, संरक्षण, जलवायू परिर्वतन अादी करारांचा समावेश अाहे. या वेळी फाउरे यांनी बहुपक्षीय व्यापार करारासह सुरक्षा, संरक्षणाबाबत माेदींच्या दूरदर्शी धाेरणाचे काैतुक केले. भारत सेशल्सला सागरी सुरक्षेसाठी ६८१ काेटींचे कर्ज देणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...