आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari: ललितच नव्हे ही व्यक्तीदेखिल लिहायची डायरीमध्ये संदेश, प्रकरणात नवीन खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील बुराडी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूप्रकरणी एकानंतर एक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात घरात सापडलेल्या डायऱ्या आणि त्यावरील मजकूर हा एक महत्त्वाचा पुरावा समजला जात आहे. मात्र या पुराव्याशी संबंधित एक नवा खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे या डायऱ्यांवरील बहुतांश मजकूर हा प्रियांकाच्या हस्ताक्षरात आहे. म्हणजे ललित शिवाय प्रियांकादेखिल या डायरीत नोंदी करत होती. 


ललितच्या शरिरातील प्रवेश केलेल्या आत्म्याने सांगितलेल्या नोंदी घ्यायची प्रियांका 
प्रियांकाचे हस्ताक्षर या डाऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, जेव्हा ललितच्या शरिरात त्याच्या मृत वडिलांची आत्मा प्रवेश करते असे ललित सांगायचा, त्यानंतर तो जे काही सांगेल ते प्रियांका डायरीत लिहित असावी. ललितचे कुटंबीय त्याचे सर्वकाही ऐकायचे. तो म्हटलेले काहीही टाळत नव्हते. त्याच्याकडे काहीतरी अदृश्य शक्ती आहे, असे सर्वांना वाटत होते. 


ललितच्या बोलण्यावर सर्वांनी ठेवला अंधविश्वास 
ललितने सर्वांना सांगितले होते की, मृत वडिलांच्या आदेशावर कोणीही प्रश्नचिन्हं उपस्थित करायचे नाही. तसे केल्यास सर्व होत्याचे नव्हते होईल, असे तो सांगायचा. त्यांचे आदेश ऐकूण कुटुंबाचा कसा फायदा झाला यासाठी त्याने पुरावेही दिले होते. प्रियांकाने त्याचे ऐकले तर मंगळ असूनही तिचे लग्न ठरले, त्याचा व्यवसाय वाढला, एकाची तीन दुकाने झाली, भावाची मुलगी शाळेत पहिली आली असे तो सांगायचा. अशा बोलण्यामुळे सर्वजण ललितवर विश्वास ठेवायचे. डायऱ्यांमध्ये सापडलेल्या नोट्सनुसार ललित वडिलांशी नेहमी वाद घालत असावा असेही समोर आले आहे. 

 

कोण होती प्रियांका...
मृतांपैकी एक असलेली 33 वर्षीय प्रियांका ही ललितची भाची होती. ललितच्या कुटुंबाबरोबर तिचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच म्हणजे 17 जून रोजी प्रियांकाचा साखरपुडा झालेला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...