आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकार विरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव, सोनिया म्हणाल्या, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- बजेट सेशनमध्ये तेलुगु देसम पार्टी, वायएसआर काँग्रेसने अनेकदा अविश्वास प्रस्तावाची नोटिस दिली होती 

- बजट सेशनमध्ये गोंधळामुळे लोकसभा अध्यक्षांनी वारंवार नोटिस नामंजूर केली होती. 

 

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या विरोधातील पहिल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मंजुरी दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी काँग्रेस आणि तेलुगु देसम पार्टीने अविश्वास प्रस्तावाची नोटिस दिली होती. त्यावर शुक्रवारी चर्चा होईल. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आम्हाला काही अडचण नाही. मोदी सरकारच्या विरोधात आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. 


संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले की, सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यास तयार आहे. आम्ही सहजपणे विजय मिळवू. कारण संसदेत आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. बहुमताच्या बाबतीच भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला अविश्वास ठरावाची चिंता नाही. सरकारकडे लोकसभेमध्ये 312 खासदार आहेत. 

 

एनडीएच्या सहकारी दलांच्या खासदारांची एकूण संख्या - 312, बहुमतासाठी आवश्यक 271 

पक्ष खासदार
भाजप 273 
शिवसेना 18
लोजपा  06
अकाली दल  04 
रालोसपा  03 
जेडीयू  02 
अपना दल  02 
एनपीपी 01 
एनडीपीपी  01
आरएसपी  01
एसडीएफ 

01

एकूण 312

 

आतापर्यंत 26 अविश्वास प्रस्ताव 
लोकसभेच पहिला अविश्वास प्रस्ताव 1963 मध्ये जवाहरलाल नेहरू सरकारच्या विरोधात सादर केला होता. समाजवादी आचार्य कृपलानी यांनी सो सादर केला होता. इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात विक्रमी 15 अविश्वास प्रस्ताव सादर केले गेले होते. आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या 25 प्रस्तावांपैकी 4 आवाजी मतदानाने फेटाळण्यात आले. इतरांचा निर्णय मतदानाने झाला. एनडीएच्या विरोधात पहिला अविश्वास प्रस्ताव 1999 मध्ये सादर करण्यात आला होता. त्यावेळी वाजपेयी सरकार एका मताने पडले होते. एवढ्या कमी फरकाने हारणारे वाजपेयी हे पहिले पंतप्रधान आहेत. 1996 मध्येही वाजपेयींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण त्यांनी आधीच राजीनामा दिली होता. 2003 मध्ये काँग्रेसने पुन्हा वाजपेयींच्या नेतृत्वातील सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. पण तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे बहुमत होते. लोकसभेत आजवर एकूण 26 अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...