आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मून संरक्षणात करार करणे शक्य, सीमा-व्यापारावरही चर्चा होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन रविवारी नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासमवेत पत्नी किम जोंग-सुक, कॅबिनेटचे वरिष्ठ सदस्य, अधिकारी व १०० उद्योगपतीही आहेत. मून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. सोमवारी मून भारत-कोरिया बिझनेस फोरमच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींसोबत गांधी स्मारकाला भेट देतील. उभय नेते त्यानंतर नोएडाच्या सॅमसंग प्रकल्पात जातील. १० जुलैला राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत होईल. यानंतर ते हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यादरम्यान संरक्षण क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे. याशिवाय जागतिक मुद्द्यांवर परस्पर हिताशी संबंधित चर्चा करतील. दोघांमध्ये अमेरिका-चीन व्यापार युद्धाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


रणनीतिक भागीदारीचा दुसरा टप्पा : मोदींची सुरुवात, आता मून यांची वेळ 
मून यांच्या दौऱ्यातून रणनीतिक भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू होण्याची आशा आहे. याची सुरुवात मोदींच्या "अॅक्ट ईस्ट'द्वारे २०१५ मध्ये केली होती. भारत दोन्ही कोरियाई देशांना महत्त्व देतो. हे लक्षात घेऊन मून आपल्या नव्या दक्षिणी नीतीअंतर्गत "थ्री पी' अजेंड्यावर पुढे जाऊ इच्छित आहेत. पहिला पी पीपल्स म्हणजे लोक सांस्कृतिक, पर्यटनाचे संबंध वाढवणे, प्राॅस्पेरिटी (समृद्धी) म्हणजे भागीदारीद्वारे व तिसरा पी पीस म्हणजे शांतीद्वारे आहे. 


भारतात द. कोरियाच्या सॅमसंगसह ५०० हून जास्त कंपन्या कार्यरत 
भारतात दक्षिण कोरियाच्या सॅमसंग, एलजी, ह्युंदईसह ५०० हून जास्त कंपन्या व्यवसाय करत आहेत. दक्षिण कोरिया, भारताची महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया, स्किल इंडिया व स्टार्टअप इंडिया योजनेस सहकार्य करत आहे. कोरिया ७० हजार कोटी रु. जमा करण्यात मदत करत आहे. कोरियाने यामध्ये सहभाग वाढवावा, अशी भारताची इच्छा आहे. दक्षिण कोरियात ११ हजार भारतीय राहतात. १००० विद्यार्थी तिथे पी.एचडी. करत आहेत. 


भारताचा द. कोरियाशी १.३६ लाख कोटींचा व्यवसाय 
दक्षिण कोरिया, भारताचा व्यापारातील मोठा भागीदार आहे. गेल्या वर्षी त्यांनी १.३६ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. १० वर्षांत त्यांनी भारतात सुमारे ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. असे असले तरी दक्षिण कोरिया व चीन यांच्यात भारतापेक्षा १२ पट म्हणजे १६ लाख कोटींचा वार्षिक व्यवसाय होतो. भारत व दक्षिण कोरिया एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्याजवळ प्रगत तंत्रज्ञान व तज्ज्ञांसह भांडवल आहे. भारताकडे मोठी बाजारपेठ, मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. 


चीनच्या बरोबरीनेच भारताला महत्त्व देतो 
भारत जास्त संरक्षण उपकरणे खरेदी करतो. यामुळे कोरियाई कंपनी भारताकडे मोठे व्यापारी क्षेत्र म्हणून पाहते. याशिवाय चिनी दृष्टिकोनामुळे द. कोरिया, भारतास समानतेने पाहतो. 

बातम्या आणखी आहेत...