आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SSC परीक्षांमध्ये घोटाळ्याचा आरोप: 2 हजार विद्यार्थ्यांचे दिल्लीत चौथ्या दिवशीही आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर फुटी आणि निवडीमध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. देशभरातून आलेले 2 हजार युवक-युवती 4 दिवसांपासून एसएससी ऑफिसबाहेर आंदोलन करत आहेत. गुरुवारी स्वराज पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. दुसरीकडे आयोगाचे चेअरमनने पेपर फुटी प्रकरणी उमेदवारांकडून पुरावे मागितले आहेत. तर उमेदवारांचे म्हणणे आहे की एसएससीने त्यांचे पुरावे फेटाळले आहेत. घोटाळ्याच्या रॅकेटची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

 

काय आहे विद्यार्थ्यांचे आरोप 
- आंदोलनात सहभागी कुमार अग्निवेशने सांगितले, की एसएससी परीक्षेत मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरु आहे. त्यांनी पदानुसार रेट निश्चित केले आहे. उदाहरणार्थ इन्कम टॅक्ससाठी 35 लाख रुपये, सब इन्सपेक्टरसाठी 25 लाख रुपये आणि क्लार्कसाठी 8 लाख रुपयांपर्यंत मागितले जातात. 

काय आहे प्रकरण ? 
- 22 फेब्रुवारीला ग्रॅज्यूएट लेव्हल टियर-II परीक्षा झाली होती. याच्या पहिल्या भागासाठी 17 फेब्रुवारीला दिल्लीतील एका सेंटरवर परीक्षा घेतली गेली होती. त्यातच पेपर फुटीचा आरोप झाला होता. 
- 17 फेब्रुवारीची परीक्षा रद्द करणे आणि घोटाळ्याच्या रॅकेटची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 
- अशी माहिती आहे की परीक्षेतील घोटाळ्याला वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर याविरोधात मोहिम सुरु केली होती. हळुहळु यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. 

बातम्या आणखी आहेत...