आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराने केले बजेटचे स्वागत, शेअर्सच्या कमाईवरही लागणार LTCG टॅक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शेअर बाजार कोसळल्यानंतर रिकव्हरी पाहायला मिळत आहे. बजेटमध्ये शेअर्समधून होणाऱ्या कमाईवर लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) टॅक्स लावण्याची घोषणा करताच बाजार कोसळायला सुरुवात झाली होती. तथापि, मार्केटने पुन्हा उभारी घेतली. सेन्सेक्स खालच्या पातळीवरून 907 अंकांनी मजबूत होऊन 36,172 च्या स्तरावर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी परत 11,000 च्या पातळीवर व्यवहार करू लागला आहे. उलाढालीदरम्यान सेन्सेक्स 35,526 च्या पातळीवर कोसळला होता. निफ्टीतही 10,921 च्या पातळीपर्यंत घट दिसली. याचदरम्यान, पीएसयू बँक शेअर्समध्ये अचानक वेगाने विक्री वाढल्याचे दिसले. कृषी क्षेत्रासाइी बजेटमध्ये सकारात्मकता दिसल्याने या क्षेत्राशी निगडित शेअर्समध्ये वाढ होत असल्याचे दिसले.


FY 18 साठी फिस्कल डेफिसिट 3.5%
सरकारने FY 18 चे फिस्कल डेफिसिट 3.5 टक्के राहण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते, जर सरकारने फिस्कल डेफिसिट 3.2 टक्क्यांच्या खाली ठेवले असते, तर मार्केटसाठी हे सकारात्मक ठरले असते, परंतु 3.5 टक्के उद्दिष्ट ठेवल्याने बाजाराची निराशा झाली आहे.

 

बजेट सादर होण्याआधी अशी होती स्थिती...

बजेट सादर होण्याआधी शेअर मार्केटची तेजीने सुरुवात झाली. सेन्सेक्स 215 अंकांनी मजबूत होऊन 36,178 आणि निफ्टीत 28 अंकांनी मजबूत होऊन 11,058 च्या पातळीवर व्यवहार होत आहे. निफ्टीमध्ये 11 पैकी 9 इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे, बजेटच्या ठीक आधी सरकारी बँकांच्या निर्देशांकांमध्येही चांगली वाढ दिसून येत आहे. बुधवारी शेअर बाजार घट होऊन बंद झाला होता. सेन्सेक्स 69 अंकांनी घटून 35,965 वर बंद, तर निफ्टी 20 अंकांनी कोसळून 11,030 अंकांवर बंद झाला होता.

 

निफ्टीमध्ये 11 पैकी 9 निर्देशांकांमध्ये तेजी... 
निफ्टीमध्ये 11 पैकी 9 इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे. मेटल आणि फार्मा इंडेक्सला सोडून सर्व इंडेक्स हिरवी निशाणी दाखवत आहेत. पीएसयू बँक इंडेक्स आणि रिअल्टी इंडेक्समध्ये सर्वात जास्त तेजी आहे. पीएसयू बंक इंडेक्स 0.67 टक्के आणि रिअल्टी इंडेक्स 0.59 टक्के तेजीसह व्यवहार करत आहे. एलअँडटी, हिंदुस्थान पेट्रोलियम, एचसीएल टेक, आयआयएफएल, अवंती फीड्स, एस्कॉर्ट्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी आहे. दुसरीकडे, एनटीपीसी, इन्फोसिस, डॉ. रेड्डी आणि वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये घट दिसून येत आहे. 

 

बजेटच्या अपेक्षेमुळे बँकिंग सेक्टरमध्ये तेजी...
बजेटच्या ठीक आधी सरकारी बँकांमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. पीएनबी, एसबीआय आणि इंडियन बँकेसह सर्व सरकारी बँकांचे शेअर्स वाढले. इंडियन बँकेत 3.05 टक्के, एसबीआयमध्ये 1.35 टक्के, बँक ऑफ इंडियामध्ये 1.05 टक्के आणि पीएनबीमध्ये 1.55 टक्के तेजी दिसून येत आहे. प्रायव्हेट बँकांमध्ये इंडसइंड बँकेत 25 टक्के तेजी आहे.

 
मिडकॅप शेअर्समध्ये घट
मिडकॅप शेअर्समध्ये थोड़ा दबाव आहे, परंतु स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.2 टक्के घटला आहे, तर निफ्टीचा मिडकॅप 100 इंडेक्समध्ये 0.1 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.5 टक्के मजबूत झाला आहे.

मिडकॅप शेअर्समध्ये एक्साइड, रिलायन्स कम्युनिकेशन्स, टीव्हीएस मोटर, आदित्य बिर्ला फॅशन आणि कॅस्ट्रॉल 2.5-0.9 टक्के पर्यंत घटले आहेत. तथापि, मिडकॅप शेअर्समध्ये सीजी कन्झ्युमर, इंडियन होटल्स, एसजेव्हीएन आणि जीएमआर इन्फ्रा 3.1-1.8 टक्क्यापर्यंत वाढ आहे.

 

हे शेअर्स 52 आठवडे टॉपवर
बजेटच्या दिवशी एलअँडटी, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडिया बुल्स, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, आरआयएल, भारत फोर्ज, कोटक बँक, डॉबर, जेएसडबल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि एचयूएलचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चतम पातळीवर व्यवहार करत आहेत.
 
अमेरिकी बाजार वाढीसह बंद...
लगातार दोन दिवसांच्या घटीनंतर बुधवारी अमेरिकी बाजारात वाढ दिसून आली. डाउ जोन्स 72 अंकांनी वाढून 26,149 अंकांवर बंद झाला. नॅसडॅक इंडेक्स 9 अंकांनी वाढून 7,411 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, एसअँडपी 500 इंडेक्स 0.05 टक्केच्या वाढीसह 2,824 अंकांवर बंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...