आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Black Money: 4 वर्षांनंतरही सरकारला हवा आणखी वेळ; माहिती मिळवण्‍यासाठी 1 वर्ष लागणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सत्‍तेवर येताच विदेशातील काळा पैसा भारतात आणू, असे म्‍हणणा-या भाजप सरकारने यासाठी आता आणखी एका वर्षाचा वेळ मागितला आहे. मागील 4 वर्षे विदेशातील काळा पैसा देशात आणण्‍याचे मोदी सरकारतर्फे प्रयत्‍न केले जात आहे. मात्र यामध्‍ये अद्याप सरकारला यश आलेले नाही. अशात हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी स्विस बँकेत जमा भारतीय नागरिकांच्‍या खात्‍याची माहिती मिळवण्‍यासाठी आणखी एक वर्ष लागेल, असे म्‍हटले आहे. मंत्री गोयल म्‍हणाले की, 'जानेवारी 2018 पासून ते डिसेंबर 2018 पर्यंतचे आकडे पुढील वर्षी मार्चपर्यंत मिळतील. दि्विपक्षीय करारा अंतर्गत स्विर्त्‍झलँड सरकार ही माहिती भारताला पुरवणार आहे.'


दोन्ही देशांची ऑटोमॅटिक डेटा शेअरिंग प्रणाली
स्विस बँका गोपनीयतेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतासह काही देशांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यास प्रारंभ केल्यानंतर या बँका परदेशी ग्राहकांची माहिती देऊ लागल्या. काळ्या पैशाविरुद्ध लढाईत भारताला मदत करण्याची हमी या बँकांनी दिलेली आहे. यासाठी माहितीचे ऑटोमॅटिक ट्रान्सफर होईल.

 

स्विस बँकांत भारतीयांचा पैसा 50% वाढून 7 हजार कोटींवर
काळा पैसा साठवण्याचे कोठार म्हणून जगभर बदनाम असलेल्या स्विस बँकांमध्ये भारतीयांचा पैसा तब्बल ५०.२% वाढला आहे. २०१७च्या अखेरीस या बँकांत भारतीयांचे सुमारे ७ हजार कोटी रुपये जमा होते. मोदी सरकारच्या सुरुवातीच्या ३ वर्षांच्या काळात या बँकांतील भारतीयांची रक्कम कमी होत होती. मात्र, चौथ्या वर्षी प्रथमच ही रक्कम एकदम ५० टक्के वाढली आहे. गेल्या १३ वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. भारतात काळ्या पैशाविरुद्ध मोदी सरकारने एवढी कडक मोहीम सुरू केलेली असताना वाढलेली ही रक्कम धक्कादायक आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकिंग अॅथॉरिटीने (स्विस नॅशनल बँक) गुरुवारी हे आकडे जाहीर केले.

 

3200 कोटींचे फक्त ग्राहकांचे डिपॉझिट
स्विस बँकांत जमा सात हजार कोटी रुपयांतील ३२०० कोटी रुपये ग्राहकांचे डिपॉझिट आहे. यातील १०५० कोटी रुपये इतर बँकांच्या माध्यमातून जमा झाले. तर २६४० कोटी बाँड व इतर माध्यमातून जमा झाले. म्हणजेच या तिन्ही प्रकारे पैसा वाढला आहे. या बँकेत ६,८९१ कोटी रुपये भारतीयांनी प्रत्यक्षरीत्या ठेवले आहेत, तर ११२ कोटी वेल्थ मॅनेजरच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...