आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video काश्मीरमध्ये विद्यापीठात सुरू होते राष्ट्रगीत, तरीही बसून राहिले काही विद्यार्थी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - जम्‍मू-काश्‍मीरच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीत राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचे समोर आले आहे. गुरुवारी (4 जुलै) ला विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाला. याचा व्हिडिओ ANI ने प्रसिद्ध केला आहे. यात राष्ट्रगीत सुरू असतानाही काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसलेले असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांच्या पदवी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. 


विद्यापीठाने फेटाळला दावा 
या व्हिडिओबाबत यूनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार प्रो. एम. अफजल जरगार म्हणाले की, दीक्षांत सोहळ्यात मेन हॉलमध्ये जितके विद्यार्थी होते, ते सर्व राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभ होते. हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे आम्हाला माहिती नाही. आमच्या समोर अद्याप अशी बाब आलेली नाही की, राष्ट्रगीत सुरू असताना कोणी बसलेले होते. 


आधीही घडला आहे असा प्रकार 
असा प्रकार घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशाच प्रकारची घटना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जम्‍मूतील बाबा गुलाम शाह बादशाह युनिव्हर्सिटीत घडली होती. त्याठिकाणी दोन विद्यार्थी राष्‍ट्रगीतावेळी उभे राहिले नव्हते. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रगीताच्या अपमानाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...