आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची मुदत वाढवली 31 मार्च 2018 पर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची मुदत पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती. मंगळवारी जारी अधिसूचनेनुसार आधारसह पॅन कार्ड वा फॉर्म ६० देण्याची तारीखही ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


दरम्यान, विविध सरकारी सेवा व योजनांसाठी आधार सक्तीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाचे ५ पाच सदस्यीय घटनापीठ गुरुवारपासून सुनावणी सुरू करेल. याआधी ७ डिसेंबरला केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयाला सांगितले होते की, विविध सेवा व योजनांसाठी आधार बंधनकारक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत केली जाऊ शकते. पॅन कार्ड अाधारशी लिंक करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...