आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’ सुरक्षित तर धोनीचा डेटा चोरीस गेलाच कसा? सरकारवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आधार कार्डला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर दुसऱ्या दिवशीही सुनावणी झाली. सरकारकडून अनेकदा ‘आधार’चा डेटा सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. परंतु क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा डेटा चोरीस गेलाच कसा? असा प्रश्न न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी उपस्थित केला.


याचिकाकर्त्याकडून वरिष्ठ वकील श्याम दिवाण यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, माझी वैयक्तिक माहिती इतर कोणालाही देण्यास सरकार मला बाध्य करू शकत नाही. यावर न्या. चंद्रचूड यांनी आपला डेटा मोबाइल कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. मग ‘आधार’पासून काहीही अडचण असण्याचे कारण नाही, असे म्हटले. पुढील सुनावणी मंगळवारी होईल.

बातम्या आणखी आहेत...