आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहल 7 आश्चर्यांपैकी एक, लोकांनी इतर मशिदींमध्ये नमाज पठन करावे-सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- आगरा प्रशासनाने ताजमहल परिसराततील एका मशिदीत नमाज पठन करण्यावर बंदी लावली होती. 

- जानेवारी महिन्यात यासंबंधी आदेश देण्यात आले होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. 
 

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने ताजमहल परिसरातील एका मशिदीत नमाज पठन करण्यास नकार दिला आहे. सोमवारी जस्टीस एके सिकरी आणि जस्टिस अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले की, ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याठिकाणी नमाज पठन करू नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्याशिवाय इतर अनेक मशिदींमध्ये लोक नमाज पठन करू शकतात, पण याठिकाणी नाही. 


24 जानेवारी 2018 ला आगऱ्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी (एडीएम) यांनी आगऱ्याचे रहिवासी नसलेल्यांना शुक्रवारी ताजमहल परिसरात नमाज अदा करण्याची परवानगी देता येणार नाही असे आदेश दिले होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी असे आदेश दिले. या निर्णयाच्या विरोधात ताजमहल मशीद प्रबंधक समितीचे अध्यक्ष इब्राहीम हुसैन झैदी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. झैदी यांनी कोर्टात म्हटले होते की, आगऱ्यात वर्षभर अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे हा निर्णय अवैध आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...