आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी प्राॅपर्टी नव्हे, पती तिला सोबत राहण्यासाठी दबाव टाकू शकत नाही : सुप्रीम कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पत्नी प्राॅपर्टी वस्तू नाही आणि पती तिला आपल्यासोबत राहण्यास तिच्यावर दबाव टाकू शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाने एका प्रकरणाचा निकाल देताना म्हटले आहे कि पतीची पत्नीला सोबत ठेवण्याची इच्छा असली तरी तो तिच्या मनाविरुद्ध तिला आपल्यासोबत ठेवू शकत नाही. या प्रकरणात पती आपल्या पतीसोबत राहण्यास तयार नव्हती आणि पती तिच्यावर सोबत राहण्यास दबाव टाकत होता. काय आहे प्रकरण.....


पती मारहाण करतो, घटस्फोट हवा
न्यूज एजंसीनुसार, एका महिलेने आपल्या पतीवर मारहाणीचा आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले. महिलेच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की पतीच्या त्रासामुळेच पीडितेला घटस्फोट हवा आहे. 

 

पत्नीवर दबाव टाकता येत नाही 
न्यायाधीश मदन व्ही लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या बेंच ने हा महत्वपूर्ण निकाल देताना म्हटले की, ती (पत्नी) प्राॅपर्टी नाही. तिच्यावर तुम्ही दबाव टाकू शकत नाही. जर ती तुमच्या सोबत रहायला तयार नाही तर तुम्ही तिला कसे सोबत ठेवू शकता. तो (पती) इतका बेफिकिर कसा असू शकतो? तो (पती) तिला (पत्नी) स्वत: ची प्राॅपर्टी कसा समझू शकतो. ती काही वस्तू नाही". कोर्टाने पतीला त्याच्या निर्णयावर परत विचार करण्याचा सल्ला दिला. यावर पतीच्या वकिलांनी सांगितले की त्या दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला जाईल कोर्टाला आधी आढळले होते की या प्रकरणातील पती-पत्नी दोघेही सुशिक्षित आहेत. त्यामुळे एकमेकांविरुद्ध केसेस दाखल केल्याने प्रकरण वाढू शकते. त्यामुळे ही केस मध्यस्थाकडे रेफर केली होती. यावर ते दोघेही राजी झाले होते. पण पत्नीला आता घटस्फोट हवा आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...