आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू गंभीर बाब, पोस्टमाॅर्टेम अहवाल सादर करा;सुप्रीम कोर्टाचा अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोहराबुद्दीन एन्काउंटर खटल्याची सुनावणी करत असलेले सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांचा गूढ परिस्थितीत झालेला मृत्यू हे गंभीर प्रकरण असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला न्या. लोया यांचा पोस्टमॉर्टेम अहवाल व इतर दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्या. अरुण मिश्रा व एमएम शांतानागौदर यांच्या पीठाने पुढील सुनावणी १५ तारखेला मुक्रर करताना सांगितले की, दुसऱ्या पक्षाचे म्हणणे एेकल्याविना या प्रकरणाची सुनावणी करता येणार नाही. पत्रकार बंधुराज संभाजी लोणे यांनी सुप्रीम कोर्टात न्या. लाेया मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. पंजाब अँड हरियाणा हायकोर्ट बार असोसिएशनच्या ४७० सदस्यांनीही सरन्यायाधीशांना पत्र लिहून तपासाची मागणी केलेली आहे. 

 

आक्षेपांकडे डोळेझाक नाही : कोर्ट
तत्पूर्वी, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले, हा खटला मुंबई हायकोर्टात सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर सुनावणी केली तर पुढे आणखी गुंतागुंत निर्माण होईल. त्यावर कोर्ट म्हणाले, आम्ही याचिकांवर विचार करू, मात्र या आक्षेपांकडे डोळेझाक करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...