आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या धोरणामुळेच आज पाक वेगळा पडला आहे: परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्‍वराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुषमा स्वराज यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी राज्यमंत्री व्ही.के.सिंह उपस्थित होते.. - Divya Marathi
सुषमा स्वराज यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी राज्यमंत्री व्ही.के.सिंह उपस्थित होते..

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी वार्षिक पत्रपरिषद घेतली. त्यांनी पाकिस्तान, डोकलाम, रशिया, विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण या प्रश्नांची उत्तरे दिली. स्वराज म्हणाल्या की, जेव्हा सीमेवर अंत्ययात्रा निघतात तेव्हा चर्चेचा आवाज चांगला वाटत नाही. ‘दिव्य मराठी’च्या प्रश्नावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.  

 

रशियाशी ७०   वर्षांच्या मैत्रीत बाधा आली आहे का? तो पाकजवळ गेला आहे, शस्त्रे देत आहे?  
सुषमा : हव्या त्या देशाशी संबंध मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे. भारत आणि रशियाच्या संबंधांत बाधा आलेली नाही. तसे असते तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना अनौपचारिक चर्चेसाठी बोलावले नसते. व्यग्र कार्यक्रमातून त्यांच्यासोबत सलग १० तास व्यतीत केले नसते. परस्परांशी फोनवर चर्चा केली नसती. शस्त्रास्त्र विक्रीबाबत सांगायचे तर प्रत्येक देशाच्या व्यावसायिक गरजा असतात.  


पाकिस्तानबाबत सरकारचे धोरण फ्लिप-फ्लॉप (गुळमुळीत) आहे असे का वाटते?  
उत्तर : हा प्रश्न काँग्रेसतर्फे विचारला गेल्याचे वाटते. पाकिस्तानबाबत आमचे स्पष्ट धोरण आहे की चर्चा आणि दहशतवाद सोबत चालू शकत नाही हे मी स्पष्ट करू इच्छिते. या धोरणामुळेच आज पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा पडला आहे.

 
चीनसोबत डोकलाममध्ये जी स्थिती तयार झाली, त्यामुळे देशाची फजिती झाली नाही का?  
उत्तर : डोकलाममध्ये जी स्थिती झाली आणि त्यानंतर भारताने ज्या प्रकारे हे प्रकरण कूटनीतिक आणि परस्पर चर्चेद्वारे सोडवले त्याची जगभर प्रशंसा होत आहे. आमच्या भक्कम विदेश धोरणाचाच हा परिणाम आहे.  


असे म्हटले जाते की, परराष्ट्र मंत्रालय पीएमओमध्ये विलीन झाले आहे, आता तुम्ही ट्विटरमंत्रीच आहात?  
उत्तर : जर मला परराष्ट्र धोरणाची माहिती नसती आणि परराष्ट्र मंत्रालय पीएमओमध्ये विलीन झाले असते तर मी येथे तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नसती. ट्विटरबाबत बोलायचे झाले तर त्याने देशाच्या लोकांना जोडण्याचे काम केले आहे. आज ट्विटरमुळेच परराष्ट्र धोरण लोकधोरणाशी जोडले जाऊ शकले. आम्ही परदेशात राहणाऱ्या लोकांच्या समस्या त्यामुळे त्वरित सोडवू शकत आहोत.  


मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी कोणते पाऊल उचलले आहे?  
उत्तर : फरार विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची विनंती ब्रिटनकडे केली आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी ब्रिटिश पीएम थेरेसांशीही चर्चा केली आहे. मोदींनी थेरेसांना सांगितले की, आमचे फरारी जेव्हा तेथे जातात तेव्हा त्यांना भारतात पाठवण्यास विलंब होतो. ब्रिटिश कोर्टाने म्हटले की आम्ही भारतीय तुरुंग पाहण्यास येऊ. मोदींनी थेरेसांना सांगितले की, हे तेच तुरुंग आहेत जेथे तुम्ही महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि भारताच्या मोठ्या नेत्यांना ठेवले होते, हे मी सांगू इच्छितो.  


अलीकडेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक चर्चेची गरज का भासली?  
उत्तर : अनौपचारिक चर्चा ही चर्चेची नवी पद्धत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अधिकृत निमंत्रण देऊन अनौपचारिक चर्चेसाठी प्रथमच पुढाकार झाला आहे. रशिया, जर्मनीसोबतही तसे झाले. तीन भेटींचे नियम आम्हाला निश्चित करायचे होते. तीन उद्देशांसाठी ती झाली. संबंधांत सहजता वाढवणे, वैश्विक मुद्द्यांवर परस्पर समजूत आणि पारंपरिक विश्वास वाढावा.  

 

 

बातम्या आणखी आहेत...