आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- रस्त्यावरून जात असताना अथवा घरातील केरकचरा रस्त्यावर आणून टाकण्याची सवय दिल्लीकरांना आता महागात पडणार आहे. दिल्ली शहरात आता रस्त्यावर कचरा टाकल्यास अथवा रस्ता घाण केल्यास नागरिकांना २०० रुपयांपासून दहा हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारनेच ही माहिती मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली. याची अधिसूचना काढण्यात आली असून, तत्काळ प्रभावाने ती अमलात आली आहे, असे सरकारने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीश गीता मित्तल व न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने सरकार व एमसीडीला दिलेल्या आदेशात म्हटले की, आधी लोकांना या दंडाची माहिती द्या. पुरेशी प्रसिद्धी करा, असेही म्हटले आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पावती द्यावी. त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, याआधी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार यमुना नदीत व परिसरात कचरा टाकणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड केला जात होता.
> हाॅटेल, कारखाने, अपार्टमेंट अथवा सोसायटीत घाण पसरवली तर १ लाख रुपये दंड
दंडाच्या दोन श्रेणी
- २०० ते १० हजारांपर्यंत निवासी घरे, दुकाने आदी (आकारानुसार)
१० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत
औद्योगिक परिसर, अपार्टमेंट, सोसायटी, आरडब्ल्यूए, हॉटेल
प्रथमच.. कचरा उचलण्यावर शुल्क ५० ते ५ हजार रुपयांपर्यंत आकारानुसार
हेसुद्धा | दंडाची रक्कम ५ टक्के दरवर्षी वाढ
हे सर्व यासाठी
२०१७ च्या स्वच्छता रँकिंगमध्ये नवी दिल्ली महापालिकेची चौथ्या स्थानावरून ७ व्या स्थानावर घसरण. ४३४ शहराच्या यादीत दिल्ली छावणी बोर्ड १७२, पूर्व एमसीडी १९६, पश्चिम एमसीडी २०२, व उत्तर एमसीडी २७९ व्या स्थानावर
डिसेंबर २०१६ मध्ये एनजीटीने घनकचरा व्यवस्थापनासाठी दिल्लीत उघड्यावर कचरा टाकल्यास १० हजार रु. दंडाचे आदेश दिले.
ब्रिटनमध्ये सर्वाधिक दंड
- कॅलिफोर्निया | १००० डॉलर (६४००० रुपये)
- ऑटारियो टाऊनशिप |२५०० युरो (१ लाख ९६ हजार)
- ऑस्ट्रेलिया | २०० डॉलर (१० हजार रुपये)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.