आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp मेसेज टॅप करणे हे पाळत ठेवल्यासारखेच; सोशल मीडिया कम्युनिकेशन हबवर :SCचे ताशेरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने सोशल मीडिया कम्युनिकेशन हब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल म्हणजे लोकांवर पाळत ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण केल्यासारखे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. टीएमसी आमदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर कोर्टाने केंद्राकडून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. 


सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांची मदत मागितली. सरन्यायधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले, सरकार नागरिकांच्या व्हॉटस्अॅप संदेशाना टॅप करू इच्छित आहे. ही बाब 'निगराणी राज' आणण्यासारखी आहे. याचिकेनुसार, केंद्र निगराणीच्या नावाखाली लोकांच्या गोपनीयतेवर प्रहार करत आहे. त्यांचे वकील ए.एम. सिंघवी म्हणाले, सरकार सोशल मीडियातील आशयावर पाळत ठेवू इच्छिते. माहिती व प्रसारण मंत्रालयाने ऑनलाइन डाटावर लक्ष ठेवण्यासाठी 'सोशल मिडिया कम्युनिकेशन हब'ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यासाठी नुकतीच निविदा काढण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...