आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरूर यांच्या 'हिंदू पाकिस्तान' वक्तव्यावरून झाला वाद; राहुल गांधींनी माफी मागावी : भाजपची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुअनंतपुरम/नवी दिल्ली- काँग्रेसचे खासदार शशी थरूर 'हिंदू पाकिस्तान' असे वक्तव्य करून वादात अडकले आहेत. भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. थरूर यांच्यावर मानसिक रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसने थरूर यांचे वक्तव्य खारीज करताना पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र, नेत्यांनी शब्दांची निवड करताना सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला आहे. माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, जदयूचे माजी नेते शरद यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मजीद मेमन यांनी थरूर यांना पाठिंबा दिला आहे. 


दुसरीकडे, आपल्या वक्तव्यावर ठाम असलेले थरूर यांनी म्हटले आहे की, भाजप हिंदू राष्ट्राची विचारसरणी मानतो. मी तेच म्हटले आहे, मग त्यासाठी माफी का मागू? थरूर यांनी फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, 'पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना दाबले आहे आणि भाजप-रा. स्व. संघालाही तेच करायचे आहे, असे मी लिहिले आहे. ज्या आधारावर दोन देशांची फाळणी झाली तो तर्क भारताने कधीही स्वीकारला नाही.' थरूर यांनी तिरुअनंतपुरममध्ये बुधवारी एका कार्यक्रमात म्हटले होते की, २०१९ मध्ये पुन्हा जिंकल्यानंतर भाजप घटनेचे पुनर्लेखन करेल आणि देश 'हिंदू पाकिस्तान' होईल. 

बातम्या आणखी आहेत...