आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार अपडेशन झाले महाग, 18% GST लागू; नाव, पत्ता बदलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधार सेवांवर UIDAI ने 18% जीएसटी लागू केले आहे. - Divya Marathi
आधार सेवांवर UIDAI ने 18% जीएसटी लागू केले आहे.

नवी दिल्ली - आधार देणाऱ्या UIDAI ने आधार सर्व्हिसेससाठी निश्चित करण्यात आलेल्या शुल्कावर GST लागू केला आहे. यामुळे आधार काढणे आता महाग झाले आहे. त्यासाठी 18% अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयानंतर आता आधार अपडेशनसाठी तुम्हाला जवळपास 5 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त द्यावे लागतील. UIDAI ने आधारच्या काही सेवांवर शुल्क आकारणी सुरु केली आहे तर काही सर्व्हिसेस मोफत आहेत. 

 

आता GST सोबत 30 रुपये द्यावे लागतील 
- मुलांशिवाय मोठ्या व्यक्तींच्या बायोमेट्रिक डिटेल्स अपडेशनसाठी UIDAI ने जीएसटी शिवाय 25 रुपये शुल्क निश्चित केले आहे. 
- याशिवाय डेमोग्राफिक डिटेल्ससाठी अर्थात नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाइल नंबर, लिंग आणि मेल अपडेशनसाठी चार्ज 25 रुपये द्यावा लागेल. 
- या सर्व सेवांवर 18% जीएसटी लावल्यानंतर हे एकूण शुल्क 29.50 रुपये एवढे होते. 

- आधार अपडेशनवर जीएसटी लागू करण्याची माहिती UIDAI ने ट्विट करुनही दिली आहे.

 

या सर्व्हिसेसवर 10 आणि 20 रुपये चार्ज 
- आधारची कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाइट) प्रिंट काढण्यासाठी 10 रुपये शुल्क आहे. तर कलर प्रिंटसाठी 20 रुपये शुल्क लागते. 

 

कोणत्या सेवा मोफत 
- UIDAI यांनी आधारसाठी एनरोलमेंट मोफत ठेवले आहे. याशिवाय मुलांसाठी बायोमेट्रिक डिटेल्स अपडेशनही मोफत  आहे. 

 

नियमापेक्षा जास्त शुल्क न आकारण्याचे आवाहन 
- UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की निश्चित शुल्कापेक्षा जास्त पैसे आधारसाठी देऊ नये. 
- त्यात म्हटले आहे, की आधार सेंटर तुमच्याकडून मोफत सर्व्हिसेसाठी शुल्क आकारत असेल, किंवा ठरवलेल्या सेवा शुल्कापेक्षा जास्त पैसे मागत असतील तर तुम्ही 1947 या क्रमांकावर फोन करु शकता. 
 help@uidai.gov.in  येथे मेल करुन तक्रार नोंदवू शकता. UIDAI त्यांच्यावर कारवाई करेल. 
 
 शुल्क भरल्याची पावती जरूर घ्या 
- UIDAI ने हे देखील म्हटले आहे की तुम्ही जर शुल्क भरून सेवा घेत असाल तर त्याची आधार सेंटरकडून पावती जरुर घ्या.  

बातम्या आणखी आहेत...