आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबांना परवडणाऱ्या ऊर्जेची देशाला गरज, पंतप्रधान मोदींनी व्‍यक्‍त केले मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चुकीच्या पद्धतीने कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम करणे योग्य नसून याची योग्य किमत ठरवण्यासाठी जागतिक पातळीवर सहमती होण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले अाहे. जगभरात तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या “ओपेक’ देशांना माेदी यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. भारताला स्वस्त आणि गरिबांना परवडणाऱ्या ऊर्जेची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.  


दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत मोदी बोलत होते. जग अनेक वर्षांपासून तेलाच्या किमतीचे रोलर कोस्टर पाहत असल्याचेही मोदी म्हणाले. त्यामुळे उत्पादक देश तसेच उपभोक्ता म्हणजेच ग्राहक देश या दोघांच्या हिताचा विचार करून तेलाच्या किमती निश्चित करण्यासाठी सामंजस्याने निर्णय घेण्याची आवश्यकता  असल्याचे मोदी यांनी सांगितले. जगाला तेल आणि गॅस संबंधित लवचिक तसेच वाहतुकीभिमुख बाजाराकडे घेऊन जाण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी या वेळी जोर दिला.  


दोघांनीही विकास साधावा : भारत जगातील सर्वात मोठा तिसरा तेलाच्या ग्राहक देश आहे. भारतात आवश्यकता असलेल्या एकूण तेलापैकी ८० टक्के तेल आयात करावे लागते. तेल उत्पादक देशांच्या हितांमध्ये इतर अर्थव्यवस्थांमध्ये ही स्थिरता दिसत असून त्यामुळे सर्व देश विकास साधत असल्याचेही मोदी यांनी सांगितले. या प्लॅटफॉर्मचा वापर आपण जागतिक पातळीवर सहमती तयार करण्यासाठी करायला हरकत नाही. या माध्यमातून तेलाचे योग्य दर ठरवले जाऊ शकतील, असेही मोदी यांनी सांगितले. 

 

सौरऊर्जा स्वस्त होतेय  
सौरऊर्जा आधीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात स्वस्त झाली आहेे. हळूहळू वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापर बंद होईल. स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा आजची आवश्यकता तर आहेच, पण याची एक किंमत निश्चित करणे महत्त्वाचे असल्याचेही मोदी म्हणाले. ऊर्जेबाबत भविष्यात चार स्तंभ महत्त्वाचे आहे- ऊर्जा उपलब्धता, ऊर्जा क्षमता, ऊर्जा स्थिरता व ऊर्जा सुरक्षा.

बातम्या आणखी आहेत...