आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Richest Giant, Mukesh Ambani, Did Not Raise The Package Even In The Tenth Year

सर्वाधिक श्रीमंत उद्याेगपती मुकेश अंबानींनी दहाव्या वर्षीही पॅकेज वाढवले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्याेगपती मुकेश अंबानी  त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सलग दहाव्या वर्षी १५ कोटी रुपये घेत आहेत. अंबानी यांनी स्वेच्छेने १० वर्षांपासून वेतनवाढ केलेली नाही. त्यांनी २००८-०९ पासून वेतन,अन्य भत्ते तसेच कमिशन १५ कोटी रुपयांवर स्थिर ठेवले आहे. याआधी त्यांचे वार्षिक वेतन-भत्ते मिळून २४ कोटी रुपये होते. ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांचे नातेवाईक निखिल व हेतल मेसवानी व कंपनीच्या पूर्णवेळ संचालकांच्या वेतनात चांगली वाढ झाली आहे.

 

निखिल तसेच हेतल यांचे वेतन-भत्ते २०१७-१८ मध्ये वाढून १९.९९ कोटी रु.(दोघांचे) केले आहे. २०१६-१७ मध्ये १६.८५-१६.८५ कोटी रुपये होते. याआधी २०१५-१६ मध्ये निखिलना १४.४२ कोटी व हेतलना १४.४१ कोटी रुपये होते.


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली. मुकेश यांचे कमिशन ९.५३ कोटी रुपये जैसे थे आहे. अन्य सुविधांच्या श्रेणीतून दिली जाणारी रक्कम ६० लाखाहून २७ लाख केली. अंबानींनी ऑक्टोबर २००९ पासून स्वत:हून वेतनावर मर्यादा घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...