आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी वादामुळे चेन्नईत सीएसकेचे सामने नाही, आयपीएल सामन्यांना विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कावेरी वादामुळे चेन्नई सुपरकिंग्जचे सामने चेन्नईतील मैदानाऐवजी इतर शहरांत स्थलांतरित होऊ शकतात. बीसीसीआयने पर्याय म्हणून विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम, पुणे व राजकोट या शहरांची निवड केली आहे. चेन्नईत सीएसकेचे ७ सामने प्रस्तावित होते. त्यापैकी एक सामना झालेला अाहे.


कावेरी वादामुळे अनेक राजकीय व सामाजिक संघटना चेन्नईत आयपीएल सामन्यांना विरोध करत आहेत. यामुळे मंगळवारी सीएसके-कोलकाता सामन्याच्या नाणेफेकीस १३ मिनिटांचा उशीर झाला. एका प्रेक्षकाने सीएसकेचा खेळाडू फाफ डुप्लेसीच्या दिशेने बूटही भिरकावला.

बातम्या आणखी आहेत...