आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या 3.7 लाख कोटींच्या बेल्ट वन रोड मध्ये भारत भागीदार नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीआे) बैठकीत मंगळवारी सहभागी झाल्या होत्या. चीनने आपल्या महत्त्वाकांक्षी बेल्ट वन रोड प्रकल्पात सहभागी व्हावे यासाठी भारताची मनधरणी केली. परंतु चीनच्या ३.७ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पात भागीदार होणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले. दुसरीकडे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचे समकक्ष जनरल वेई फेंगे यांची भेट घेऊन चर्चा केली.

 

त्या म्हणाल्या, मतभेद व वादामुळे उभय देशांतील संबंधावर वाईट परिणाम होता कामा नये. डोकलामवरून चीन व भारत यांच्यात तणाव होता. उभय देशांतील ही बैठक महत्त्वाची होती. देशाचे संरक्षण व परराष्ट्र मंत्री चीनच्या परिषदेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

 

मानवी हक्काचा खरा  शत्रू दहशतवाद  
शांघाय परिषदेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सुषमा यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. मानवी हक्काचा खरा शत्रू म्हणजे दहशतवाद. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या देशांची आेळख पटवणे गरजेचे आहे. कारण समर्थकांना दहशतवाद्यांकडून पैसा मिळतो.  

 

चीनच्या नेतृत्वाखालील  संघटनेत आठ देश 
शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना २००१ मध्ये झाली होती. त्यात कझाकिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, भारत व पाकिस्तान सदस्य आहेत. भारत व पाकिस्तान गतवर्षी सदस्य झाले होते.  

 

मोदी-जिनपिंग यांच्यात ना करार, ना संयुक्त वक्तव्य  
मोदी व जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये आैपचारिक चर्चा होईल. या दरम्यान उभय नेत्यांत कोणताही करार होणार नाही किंवा संयुक्त वक्तव्यदेखील जारी केले जाणार नाही.  उभय देशांतील समन्वय व जुन्या मुद्द्यांवरील सहमती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व चीनचे राष्ट्राध्यक्ष देंग शियाआेपिंग यांच्यातील बैठकीच्या धर्तीवर मोदी-जिनपिंग चर्चा होणार आहे.  

 

मोदी उद्या चीनच्या दौऱ्यावर,  पंतप्रधानांची ही चौथी भेट  
पंतप्रधानपद मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी गुरुवारी चीनच्या दौऱ्यावर जातील. त्यांची ही चौथी चीन भेट आहे. २०१५ मध्ये ते पहिल्यांदा द्विपक्षीय चर्चेत सहभागी झाले होते. त्यानंतर २०१६ मध्ये जी-२० परिषदेत ते सहभागी झाले होते. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...