आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली - एअर इंडिया च्या अमृतसर दिल्ली विमान हवेतच असताना वा-याच्या वेगामुळे विंडो पॅनेल आत पडल्याने तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर विमानातील आॅक्सिजन मास्क देखील उघडले गेले. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. हा प्रकार गुरुवारी घडला.
एअर इंडियाचे AI 462 हे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरुवारी अमृतसरहून दिल्लीला जात होते. त्यावेळी 10 ते 15 मिनिटं हवेच्या दाबामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विमानाला हादरे बसले. एका प्रवाशाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचं डोकं लगेज केबिनवर आदळले. 18 ए सीटवरील विंडो पॅनल खाली पडलं, मात्र खिडकीची काच शाबूत होती. मात्र विमानाला बसलेल्या हादऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. विमानत दिल्लीत पोहचल्यावर तीनही प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करत आहेत' अशी माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.