आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी आज होऊ शकतात काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान; दुपारी 3 नंतर होऊ शकते घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बिनविरोध अध्यक्षपदाची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते. तथापि, अध्यक्षपदी नियुक्तीचे अधिकृत प्रमाणपत्र १६ डिसेंबर रोजी दिले जाईल. यासोबतच सोनिया गांधी यांचा पक्षात अध्यक्ष म्हणून तब्बल १९ वर्षांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. 


पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमात मतदानासाठी १६ डिसेंबरची तारीख आहे. तथापि, अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार उभे असल्याने मतदानाची वेळ येणार आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी राहुल यांच्या समर्थनार्थ निवडणूक अधिकाऱ्याला ८९ नामांकनपत्रे मिळाली होती. पडताळणीत सर्व नामांकनपत्रे योग्य निघाली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ती संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार असल्याची घोषणा केली जाईल. पक्षातील सूत्रांनुसार १६ डिसेंबरला सोनिया गांधी त्यांना औपचारिकपणे कार्यभार सोपवतील. यानंतर त्या देशभरातील पक्षनेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...