आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट 2018 : मेडिकल हेल्थ केअर मोठा जुमला - काँग्रेस, BJP- गरीबांचा फायदा होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. - Divya Marathi
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

नवी दिल्ली - मोदी सरकारचा 2019 च्या निवडणुकीआधीचा संपूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केला. आगामी वर्षात 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. सरकार 10 कोटी कुटुंबांना आरोग्य कवच देणार आहे. काँग्रेसने या अर्थसंकल्पाला सर्व सामान्यांच्या आशा फोल ठरवणारा अर्थसंकल्प म्हटले आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले, या अर्थसंकल्पाने सर्व-सामान्यांचा हक्क हिसकावला आहे. छोटे गुंतवणूकदार आता काय करतील, असा सवाल त्यांनी केला आहे. खरगे म्हणाले, 'तीन वर्षांपासून जे बोलत होते तेच यंदाही सांगितले आहे. एमएसपी देखील तोच आहे. प्राथमिक शिक्षणासाठी जो निधी आवश्यक होता तो कमी केला आहे.' दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटला शानदार म्हटले आहे. ते म्हणाले, अर्थसंकल्पाचा सर्वाधिक फायदा गरीब आणि शेतकऱ्यांना होणार आहे. 

 

राहुल गांधी काही बोलले नाही
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेतून बाहेर पडले, तेव्हा मीडिया त्यांच्या मागे धावत होता परंतू त्यांनी काहीही रिअॅक्शन दिली नाही. बजेटवर ते काहीही बोलले नाही. मात्र नंतर त्यांनी ट्विट करुन हे भाजपचे घोषणापत्र असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बजेट आमची विकासाची गाथा पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले. 

 

 

बजेटवर कोण काय म्हणाले? 
 
राजनाथसिंह 
- हे ग्रँड बजेट आहे. गरीब, शेतकरी आणि आदिवासींसाठी यात खूप काही आहे. एवढेच नाही तर हा अर्थसंकल्प भारताला जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी उपयोगाचा आहे. 

 

चिदंबरम 
- माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते चिदंबरम म्हणाले, सरकारकडे नवीन कल्पना कोणतीच नाही, त्यामुळेच त्यांनी एक्स्पोर्ट वाढवण्यावर काहीही केलेले नाही. इम्पोर्टवर कस्टम ड्यूटी लावण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की दावोसमध्ये मोदींनी दिलेले भाषण सरकार काही दिवसांतच विसरले आहे. कृषी क्षेत्रामध्ये अनेकांना त्रास आहे. मेडिकल हेल्थ केअर हा फार मोठा जुमला आहे. 

एम.जे. अकबर 
- तुम्ही जर लक्ष दिले असेल तर 1 तास 45 मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण होते. अर्थमंत्र्यांनी यातील 1  तास गरीबांच्या योजनावर दिला. हे ऐतिहासिक बजेट आहे. विरोधक आता निराशावादी झाले आहेत. 

 

योगी आदित्यनाथ 
- देशातील गरीब, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या योजना आहेत. पंतप्रधानांचे अभिनंदन आणि अर्थमंत्र्यांना शुभेच्छा. 

 

नितीन गडकरी 
- 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचा वैद्यकीय विमा ही फार मोठी योजना आहे. हे ऐतिहासिक बजेट आहे. 

 

पीयूष गोयल 
- अतिशय संतुलीत बजेट आहे. यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार झाला आहे. प्रत्येकाला काही ना काही आहे. विशेषतः शेतकरी आणि गरीबांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळेल. 

 

योगेंद्र यादव 
- विमा, आपत्ती, सिंचन आणि कर्जमुक्ती यावर अर्थमंत्री काहीही बोलले नाही. एकही उत्पादन असे नाही ज्यावर सरकारने दीड पट एमएसपी (हामी भाव) दिलेली नाही. जेटलींनी संसदेत शेतकऱ्यांबद्दल सपशेल खोटे बोलले आहे. 

बातम्या आणखी आहेत...