आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित शेतात नांगरही चालवेल, मात्र गरीब ब्राह्मण कचरेल, त्यामुळे गरीब सवर्णांना अारक्षण मिळावे : पासवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची देशातील दलित व अाघाडीच्या राजकारणावर दैनिक भास्करचे डेप्युटी एडिटर संताेषकुमार व विशेष प्रतिनिधी अमितकुमार निरंजन यांनी मुलाखत घेतली. 

 

 

प्रश्न : लालू यादव म्हणतात, पासवान हवामानतज्ञ अाहेत. तुम्हाला काय वाटते?  
पासवान : माेदीजींच्या नेतृत्वात ‘एनडीए’चेच सरकार पुन्हा येेईल यात काेणाचेही दुमत नाही.  


प्रश्न : १९७७ प्रमाणे विराेधकांची महाअाघाडी तयार हाेतेय, त्याचा कितपत परिणाम हाेईल?  
पासवान : इंदिरा गांधींच्या काळात जी हालत ‘सिंडिकेट’ची झाली तीच या महाअाघाडीची हाेईल. त्यांचा राष्ट्रीय नेता अाहे तरी काेण? राहुल, चंद्राबाबू व ममता बॅनर्जी यांच्याकडे लाेक नेता म्हणून पाहत नाहीत. या अाघाडीत तर सगळे जण स्वत:चीच ढाेलकी वाजवू लागलेत.  


प्रश्न : मार्चमध्ये तुम्ही म्हणाला हाेतात ‘शंभर लंगडे जमवून काेणी पहिलवान हाेऊ शकत नाही.’ मात्र कैरानाच्या पाेटनिवडणुकीत महाअाघाडीने भाजपला पराभूत केले, कर्नाटकातही सरकार बनवू दिले नाही. महाअाघाडी पहिलवान बनत अाहे का?  
पासवान : काँग्रेस कर्नाटकात १२२ हून ८० जागांवर घटली, तर भाजपने ४० हून १०४ जागांवर भरारी घेतली. हा काेणाचा विजय अाहे?  मात्र कैराना व फुलपूर पाेटनिवडणुकीत भाजपचा पराभव हा चिंतेचा विषय अाहे. उत्तर प्रदेशात विकासाचा नव्हे, जातीचा मुद्दा चालला. लाेकसभा निवडणुकांत परिस्थिती बदलेल.  


प्रश्न : तुम्ही राहुल गांधींना नेता मानत नाही का?  
पासवान : बिलकुल नाही.  


प्रश्न : खरेच अार्थिक अारक्षणाची गरज अाहे का?  
पासवान : मी गरीब सवर्णांना अारक्षणाचा मुद्दा मांडताे तेव्हा त्यात अार्थिक अारक्षणाचा मुद्दा अभिप्रेत असताे. हे पाहा, एक मनाने गरीब असताे तर दुसरा पाेटाने, तर एखादा दाेन्ही बाजूंनी गरीब असताे. सवर्ण पाेटाने गरीब, तर दलित मन व पाेट दाेन्ही बाबतीत गरीब अाहे. तुम्ही त्याला खुर्चीवर बसण्यास सांगा. ताे म्हणेल, ‘मी उभाच ठीक अाहे.’ सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासांना अारक्षण मिळावे, ही घटनेतच तरतूद अाहे. भूमिहीन दलित शेतात नांगर चालवेल, मात्र भूमिहीन ब्राह्मण यासाठी कचरेल. कारण त्याला याविषयी माहितीच नसेल. त्यामुळेच गरीब सवर्णांना अार्थिक निकषावर अारक्षण द्यायला हवे.   


प्रश्न : दलितांच्या मनात अजूनही सरकारबाबत विश्वास निर्माण झालेला नाही, कारण काय ?  
पासवान : सरकार उत्तम काम करतेय, मात्र ते लाेकांपर्यंत पाेहाेचत नाही. दलित लाेक रस्त्यांवर उतरले, काही लाेक मारलेही गेले. हे लक्षात घ्यायला हवे की, मागासवर्गीय- एसी, एसटी लाेकांच्या हितासाठी त्याच वर्गातील नेतेही लढत नाहीत. अांबेडकरांशिवाय काेणत्या नेत्याने दलितांसाठी लढा दिला? अांतरजातीय विवाहांमुळे जातिव्यवस्था संपुष्टात येऊ शकेल. राेटी- बेटीची समस्या संपली तर जातीयवादही संपेल. राेटी खाण्यासाठी सगळेच तयार अाहेत, मात्र ‘बेटी’ देण्यास कुणी पुढाकार घेत नाही.  


प्रश्न : तुम्ही म्हणता, दलित व अल्पसंख्याकांविषयी भाजपने धाेरणात बदल करायला हवा. त्यांच्या धाेरणात कमतरता अाहे तरी काय?  
उत्तर : अाम्ही म्हणालाे हाेताे ‘परसेप्शन’ बदलायला हवे. माेदी सरकारने अांबेडकरांविषयी खूप काम केले. त्यांच्या जन्मस्थळापासून इतर अनेक ठिकाणी स्मारके उभारली. मात्र हे परसेप्शन पक्षात उतरायला तयार नाही. अॅट्रॉसिटीचा कायदा घटनेच्या अाधारेच झाला. सुप्रीम कोर्टाने अाराेप असणाऱ्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकताे, कायद्यात दुरुस्ती करा, असे निर्देश दिले. यावर सरकारने तातडीने अध्यादेश काढायला हवा हाेता.

 

प्रश्न : दलित आंदोलनात हिंसा झाली, लोक ठार झाले, त्याची जबाबदारी कोणाची? त्यांचा तर नेता कोणी नव्हता?  
उत्तर : सरकार जबाबदार आहे, पण मोदी सरकारला जबाबदार मानले तर ते आम्हाला मान्य नाही. सुरुवातीपासूनच घटना घडत आहेत. जातीच्या नावावर लोकांना मारले जात आहे. मग तो रोहित वेमुला का असेना. हे निंदनीय आहे. गोरक्षणाबाबत पंतप्रधानांनी म्हटले की, हल्लेखोर गुन्हेगार आहेत; वेमुलावर म्हटले की, तो भारतमातेचा पुत्र आहे.  


प्रश्न : गुजरात दंगलींवरून तुम्ही वाजपेयी सरकारचा राजीनामा दिला होता. आता मोदी किती बदलले?  
उत्तर : खूप बदलले आहेत. त्यांना सर्वांनी क्लीन चिट दिली आहे. ते २४ पैकी २० तास काम करतात. परसेप्शन बनवण्यासाठी वारंवार लोकांसमोर बोलावे लागेल. मन की बातमध्ये ते पैगंबरांबाबत बोलले होते, ती गोष्ट तर एखादा मौलानाही करू शकत नाही.  


प्रश्न : २०१४ नंतर अवॉर्ड वापसी झाली, अखलाक कांडानंतर असहिष्णुता हा मुद्दा झाला, दलितांना घोड्यावर बसण्यास रोखण्यात आले. असे वातावरण का झाले?  
उत्तर : त्याच्यावरही उपाय होत आहेत. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांच्या उपस्थितीत एका दलिताची वरात निघाली. जातपात-धर्माचा मुद्दा बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची वेळ आली आहे.  


प्रश्न : ते कसे शक्य आहे? प्रत्येक पक्ष तर जातीच्या नावावरच तिकीट वाटतो ना?  
उत्तर : जातीयवाद असल्यामुळेच. लालू यादव तुरुंगात आहेत, तर एका जातीचे लोक का आंदोलन करतात. जेथे अशी मनोवृत्ती आहे, तेथे मेरिटचा प्रश्न येतो का?  


प्रश्न : गोरखपूर आणि फुलपूरमधील पराभवानंतर आघाडीतील सर्व पक्षांनी निवडणूक रणनीती तयार करावी, असे तुमचा मुलगा चिरागने म्हटले होते.  
उत्तर : मी मंत्री आहे, त्यामुळे सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देण्यास मी बाध्य आहे. पण चिराग आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतात.  


प्रश्न : तेदेप सोडून गेला, शिवसेना विरोधात बोलते, अकाली दलाशी संबंधही चांगले नाहीत. बिहारमध्ये आघाडीत मतभेद आहेत. आघाडी फुटत आहे का?  
उत्तर : प्रत्येक आघाडीत हेच होते. उप्रत सपा-बसपा मनापासून एकत्र आले का? तिकीटवाटपाचा मुद्दा येईल तेव्हा उत्तर प्रदेशच्या सर्व ८० जागा लढण्यावरून सपा-बसपात मतभेद होणार नाहीत का? पण जेव्हा मोठे उद्दिष्ट असते तेव्हा मने एकत्र येतात.  


प्रश्न : बिहारमध्ये मोठा भाऊ कोण, भाजप की नितीश?  
उत्तर : राजकारणात कोणी मोठा किंवा लहान नसतो. लोक म्हणतात की मला वारे कळते. रामविलास पासवान जिकडे गेले त्यांचेच सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेनंतर आम्ही कोणत्या आघाडीत गेलो नाही. वाजपेयी सरकार १९९८ मध्ये एका मताने पडले होते. तेव्हा उपपंतप्रधान व्हा, असा प्रस्ताव होता. पण आम्ही म्हटले होते की, दोघांच्या विरोधात लढून आलो होतो, त्यामुळे कोणाच्याही सोबत जाणार नाही. २००५ मध्ये बिहारचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आमच्याकडे नितीशकुमार दोनदा आले होते, तेव्हा लालू यादव यांना हटवायचे होते. तेव्हाही आम्ही म्हटले होते की, आम्ही रालोआ आणि राजदविरोधात लढलो आहे, आम्ही येणार नाही.  


प्रश्न : बिहारमध्ये तुम्ही आणि भाजप नितीश यांच्याविरोधात लढले होते. आता नितीश यांच्यासोबत आहात. हा संधिसाधूपणा नाही का?  
उत्तर : नितीशकुमार यांच्याकडे तीन पर्याय होते. एक भ्रष्टाचार, दुसरा सुशासन आणि तिसरा निवडणूक. माझ्या मते वारंवार निवडणूक योग्य नाही. नितीश यांनी योग्य निर्णय घेतला होता.  


प्रश्न : भ्रष्टाचाराची गोष्ट बोलता. अमित शहांच्या मुलाच्या कंपनीची कमाई नोटबंदीदरम्यान १६ हजार पट वाढल्याची बातमी आली. त्याची चौकशीही केली नाही.  
उत्तर : कोणत्याही खासदाराला संसदेत मुद्दा उपस्थित करण्यापासून रोखले होते का? हवेत गोष्टी करून काही होणार नाही.  

 

प्रश्न : चिराग यांनी तेजस्वींना भेटून म्हटले होते की, भविष्यात दोन युवक नेत्यांनी काम केले तर आश्चर्य वाटू देऊ नये.  
उत्तर : चिरागने असे म्हटले होते की, जर आम्हीही विकासाचा मुद्दा मांडतो. तेजस्वीही विकासाची गोष्ट करतात. दोघांचेही त्यावर विचार सारखेच आहेत. दोघांचा विकासाच्या मुद्द्यावर एक सूर आहे. त्यात वाईट काय आहे?  


प्रश्न : चिराग (लोजप) आणि तेजस्वी (राजद) यांच्यात आघाडी होऊ शकते का?  
उत्तर : कधीही होऊ शकत नाही.  


प्रश्न : नोटबंदीनंतर सर्वांच्या नोटा परत आल्या. यंत्रणा चांगली होती का?  
उत्तर : यंत्रणा चांगली होती. त्यानंतरच उप्रची निवडणूक झाली. तेथे जनतेने प्रचंड बहुमताने रालोआला सत्ता दिली. श्रीमंत रांगेत उभे होते, असा विचार गरिबांनी केला. या देशात लोक आपल्या गरिबीमुळे त्रस्त नाहीत, इतरांच्या श्रीमंतीमुळे त्रस्त आहेत.  


प्रश्न : पंचाहत्तरी पार केलेल्यांना सरकारमध्ये न ठेवण्याचा भाजपचा मापदंड आहे. तुम्ही ७२ वर्षांचे आहात. राजकारणात निवृत्तीचे वय असावे का?  
उत्तर : ते जनतेवर अवलंबून आहे. जनतेने मोरारजीभाईंना ८५ व्या वर्षी देशाचे पंतप्रधान निवडले. पंचाहत्तरीत असताना जयप्रकाश नारायण यांनी राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलली होती. मी याबाबत काही विचार केला नाही.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...