आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉर्पिन क्लासची दुसरी आणि तिसऱ्या पाणबुडीचे समुद्रात ट्रायल सुरु, उर्वरीत तीनची लवकरच निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्हाइस अॅडमिरल आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडंट श्रीकांत यांनी शनिवारी सांगितले की स्कॉर्पिन क्लासची दुसरी आणि तिसऱ्या पाणबुडीची समुद्रात चाचणी सुरु आहे. उर्वरीत तीन पाणबुड्याही लवकरच पूर्ण होतील. स्कॉर्पिन क्लासच्या सहा पाणबुड्या नौदलात सहभागी केल्या जाणार आहेत. या मालिकेतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी 14 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी मुंबईत देशाला अर्पण केली होती. 

 

हवेत मारा करण्याचीही लवकरच चाचणी 
- व्हाइस अॅडमिरल श्रीकांत यांनी सांगितले की पाणबुडीवरुन हवेत मारा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एअर इंडिपेंडंट प्रपुल्यशन (AIP) ची लवकरच चाचणी केली जाणार आहे. 
- श्रीकांत यांनी सांगितले की दुसऱ्या आणि तिसऱ्या पाणबुडीची टेस्टिंग सुरु आहे. तर, चौथी, पाचवी आणि सहावी पाणबुडी सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे.