आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी जंगम मालमत्ता नाही; सोबत राहण्याचा आग्रह करू नका : सर्वोच्च न्यायालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पत्नी ही जंगम मालमत्ता किंवा वस्तू नाही. त्यामुळे तिला पतीसोबत राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे. पतीकडून छळ होत असल्याची तक्रार एका महिलेने दिली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील वक्तव्य केले. 


खटल्याच्या सुनावणीवेळी महिलेने पतीसोबत राहण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. पण पती मात्र पत्नीसोबत राहण्यासाठी तयार होता. न्यायमूर्ती मदन बी. लोकुर आणि दीपक गुप्ता यांच्या पीठाने न्यायालयात उपस्थित पतीला उद्देशून म्हटले की, पत्नी काही जंगम मालमत्ता नाही. तुम्ही तिला सोबत राहण्यास बाध्य करू शकत नाहीत. जर ती तुमच्यासोबत राहण्यास तयार नसेल तर त्यासाठी आग्रह करता येणार नाही. पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलाला न्यायालय म्हणाले की, एखादी व्यक्ती इतकी अतार्किक कशी काय असू शकते? संबंधित व्यक्ती महिलेला जंगम मालमता समजून तसा व्यवहार करत आहे. ती वस्तू नाही. यावर अशिलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वकील म्हणाले. पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...