आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत राफेलवरील प्रत्येक प्रश्नास उत्तर देऊ- निर्मला सीतारमण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल या लढाऊ विमानांच्या करारावरून विरोधकांचे आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा फेटाळून लावले. पत्रकारांशी बोलताना सीतारमण म्हणाल्या, यात काहीही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकार संसदेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे.  


शनिवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या,  राफेल कराराची बोफोर्सशी तुलना होऊ शकत नाही. कारण, यात काही घोटाळा झालेलाच नाही. पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राफेलचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.  यावर त्या म्हणाल्या, विरोधी पक्षाचे मी स्वागत करते.  आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. राफेल सौद्यात बोफोर्सप्रमाणे काही घडणार नाही, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्या म्हणाल्या, अजिबात तसे काही होणार नाही. या दोहोंची तुलना होऊ शकत नाही. राफेलमध्ये काहीच भ्रष्टाचार झालेला नाही.  

 

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर यूपीएच्या फ्रान्समधील डसाल्ट एव्हिएशन कंपनीकडून १२६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या  व्यवहाराची प्रक्रिया रद्द केली होती, हे विशेष. सरकारने थेट फ्रान्स सरकारकडून उड्डाणास तयार असलेल्या ३६ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते.  राफेलचा मुद्दा संसदेत मांडण्याचा निर्धार काँग्रेसने जाहीर केला आहे.  


जम्मू-काश्मीर तसेच पूर्वोत्तर राज्यांत सशस्त्र सैन्य दलाचा विशेषाधिकार कायदा (आफस्पा) हटवण्यासंदर्भात विचारले असता, त्या म्हणाल्या, सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही विचार नाही, असे सीतारमण यांनी स्पष्ट केले.  

 

घुसखोरांचा सीमेवरच सफाया  
एका अन्य प्रश्नाच्या उत्तरात सीतारमण म्हणाल्या, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आता सुधारत आहे. घुसखोरीला लगाम घालण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. घुसखोरांना आम्ही नियंत्रण रेषेवरून आत घुसखाेरी करू देत नाहीत. त्यांचा तेथेच सफाया करणे सुरू आहे अथवा त्यांना हुसकावून लावले जात आहे. संरक्षणमंत्री म्हणाल्या, काही वेळा घुसखोरांना भारतीय हद्दीत शिरण्यात यश मिळाले असेल.  परंतु या समस्येवर लष्कराला समाधानकारक यश मिळाले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...