आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिरात पुरुषांप्रमाणेच महिलांनाही पूजेचा हक्क, घटनापीठाने दिला निर्वाळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केरळमधील सबरीमाला मंदिरात जाऊन पुरुषांप्रमाणे पूजा करण्याचा महिलांनाही अधिकार आहे, हा घटनात्मक अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने म्हटले आहे की, कुठलाही कायदा नसला तरीही मंदिरात पूजा करण्याबाबत महिलांशी भेदभाव केला जाऊ शकत नाही. देशात खासगी मंदिराचा कुठलाही सिद्धांत नाही. मंदिर ही सार्वजनिक संपत्ती आहे. सार्वजनिक ठिकाणी जर पुरुष जाऊ शकतात तर महिलांनाही जाण्याची परवानगी मिळायला हवी. मंदिरात जाण्याच्या अधिकारासाठी कायद्याची गरज नाही. घटनेच्या अनुच्छेद २५ आणि २६ मध्ये हा अधिकार मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...