आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडात सुरू झाला जगातील सर्वात मोठा मोबाइल फोन प्रकल्प, निर्मिती होणाऱ्या ३० % फोनची निर्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा- 'मेक इन इंडिया' अभियानामुळे भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन बनवणारा देश बनला असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. चार वर्षांपूर्वी देशात केवळ दोन मोबाइल निर्मिती प्रकल्प होते, आता १२० प्रकल्प आहेत. मोदी सोमवारी येथे जगातील सर्वात मोठ्या मोबाइल बनवणाऱ्या प्रकल्पाच्या उद््घाटन समारंभात बोलत होते. 


या प्रकल्पात निर्मिती होणारे सुमारे ३० टक्के फोन निर्यात केले जाणार अाहेत. हा प्रकल्प दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगचा आहे. या ठिकाणी स्वस्त फोनपासून ते एस-९ पर्यंत सर्व प्रकारच्या स्मार्टफोनची निर्मिती होणार आहे. सुमारे ५,००० कोटी रुपयांच्या विस्तारानंतर या प्रकल्पाची क्षमता वार्षिक १२ कोटी स्मार्टफोन बनवण्याची झाली आहे. या आधीची क्षमता ६.८ कोटी फोन बनवण्याची योजना होती. या वेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जाए इन यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या विस्तारामुळे सुमारे २००० लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पात तयार होणारे फोन मध्य पूर्व आणि आफ्रिकी देशांमध्ये निर्यात केले जाणार आहेत. 


१९९७ मध्ये कंपनीने देशात पहिला प्रकल्प सुरू केला होता 
- देशात २ निर्मिती प्रकल्प - नोएडा, श्रीपेरुंबदूर 
- आरअँडडी सेंटर्स - ५ 
- रोजगार - ७०,००० पेक्षा जास्त 
- किरकोळ विक्री केंद्रे - १.५ लाख २०१६-१७ मध्ये मोबाइल बिझनेस महसूल - ३४,४०० कोटी रुपये 
- विक्री- ५०,००० कोटी रुपये. 

बातम्या आणखी आहेत...