आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 राज्यांत दुष्काळ? गंगा, ब्रह्मपुत्रा नद्या विस्तारतात ते जलप्रवाह आटण्याच्या उंबरठ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिमालयातून निघणारे ६० टक्के जलप्रवाह सध्या कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यात गंगा, ब्रह्मपुत्रासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या जलप्रवाहांचा समावेश आहे. यातील बहुतांश जलप्रवाहांमध्ये केवळ पावसाळ्यातच पाणी येत असते. नीती आयोगाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.   


अहवालानुसार, भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांत जवळपास ५० लाख जलप्रवाह आहेत. यातील जवळपास ३० लाख जलप्रवाह तर भारतीय हिमालय क्षेत्रातूनच निघतात. हिमालयात बर्फ वितळल्याने या जलप्रवाहांमध्ये पाणी असते. येथूनच गंगा,  ब्रह्मपुत्रासारख्या नद्यांचे जलप्रवाह निघतात. परंतु हवामान बदलामुळे कमी होणाऱ्या हिमनद्या, पाण्याची वाढती मागणी, वृक्षांची कत्तल वाढल्याने आणि भूगर्भातील बदलामुळे हे जलप्रवाह कोरडे पडत आहेत. या जलप्रवाहांचा प्रभाव जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, अासाम, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यातील ५ कोटी लोकांवर पडेल. 
पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन गरजा भागवण्यापर्यंत सर्व गोष्टी याच जलप्रवाहांवर अवलंबून आहेत. तत्काळ पावले उचलली गेली नाही तर १० वर्षांत या राज्यांत जलसंकट ओढवेल. नीती आयोगाने सर्व सदस्यांकडून १९ फेब्रुवारीपर्यंत सल्ला मागितला आहे. भारतीय हिमालय क्षेत्रातून निघणाऱ्या सर्व जलप्रवाहांची गणना करून याची मॅपिंग करण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे. 

उत्तराखंडमध्ये १५० वर्षांत जलप्रवाहांची संख्या ३६० ने घटून ६० वर आली, 6 पट घट नोंदवली गेली

भारतीय हिमालय क्षेत्रातील जलप्रवाहांची स्थिती किती वाईट होत आहे, याचा अंदाज उत्तराखंडमधील जलप्रवाहांवरून लावता येईल. १५० वर्षांत येथील जलप्रवाहांच्या संख्येत ६ पट घट झाली आहे. पूर्वी ३६० जलप्रवाह होते आज त्यांची संख्या ६० वर आली. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आयोगाने तीन टप्प्यांत नियोजन केले आहे. यात पहिला टप्पा ४ वर्षांचा असेल. दुसरा पाच ते आठ आणि तिसरा टप्पा आठ वर्षांपेक्षा अधिकचा असेल. अल्प मुदतीत जलप्रवाहांवर निरीक्षण ठेवले जाईल. दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थापन आणि तिसऱ्या टप्प्यात कामावर लक्ष केंद्रित करून त्यापासून परिणाम मिळवले जातील.

बातम्या आणखी आहेत...