आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात बोलल्या जातात १९ हजार ५६९ मातृभाषा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात मातृभाषा म्हणून बोलल्या जाणाऱ्या १९,५६९ बोलीभाषा आहेत. २०११ च्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी व त्याच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले. यानुसार, १२१ कोटींच्या लोकसंख्येत १२१ भाषा अशा आहेत की, ज्या १० हजारांहून अधिक लोकांची मातृभाषा आहे. मात्र, देशात अधिसूचित २२ भाषाच सर्वाधिक बोलल्या जातात. ९६.७१ टक्के लोकसंख्येत या भाषा बोलल्या जातात. 


भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी सांगितले, एका घरात वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक असू शकतात. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीची मातृभाषा जाणून घेणे महत्त्वाचे ठरते

बातम्या आणखी आहेत...