आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी गेल्यानंतर ३० दिवसांनी ७५ टक्के पीएफ काढता येणार; मंत्री संतोष गंगवार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ईपीएफओचा सदस्य एक महिना बेरोजगार राहिला तर त्याला पीएफची ७५ % रक्कम काढता येईल. शिवाय तो आपले पीएफ खातेही कायम ठेवू शकेल. ईपीएफओ विश्वस्तांच्या बैठकीनंतर कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. 


गंगवार यांनी सांगितले की, सरकारने या योजनेत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला असून आता महिनाभर बेरोजगार राहिलेल्या ईपीएफओच्या कोणत्याही सदस्याला पीएफची ७५ टक्के रक्कम काढता येईल. योजनेतील १९५२च्या तरतुदींनुसार दोन महिने एखादा सदस्य बेरोजगार असेल तर तो सदस्य उर्वरित २५ टक्के रक्कमही काढून खाते बंद करू शकतो. 


ईटीएफमध्ये गुंतवणूक 
ईपीएफओची ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक लवकरच १ लाख कोटींचा आकडा ओलांडेल. या वर्षी ४७,४३१.२४ कोटींची गुंतवणूक केली असून यावर १६.०७ टक्के परतावा मिळवला असल्याचे मंत्री गंगवार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...