आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘भ्रष्ट नेता’ असा उल्लेख करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी साेमवारी गडकरी यांची लेखी माफी मागितली. त्यानंतर गडकरी यांनीही केजरीवाल यांच्या विराेधातील मानहानीचा खटला मागे घेतला आहे.
यापूर्वी केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया व काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे पुत्र अॅड. अमित सिब्बल यांचीही माफी मागितली हाेती. केजरीवाल यांनी गडकरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले अाहे की, ‘तुम्हाला वेदना देणाऱ्या माझ्या वक्तव्यावर मलाच अाता खूप खेद वाटताेय. मी दिलगिरीही व्यक्त करताेय. तरी अापण न्यायालयीन खटला मागे घ्यावा.’
केजरींनी पत्रात काय लिहिले
- नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या केजरीवालांनी गडकरींना पत्र लिहून माफी मागितली. या पत्रात ते म्हणाले, 'आपल्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मी तथ्य न तपासता केले होते. वैयक्तिकरित्या मी आपला विरोधक नाही. मी केलेल्या आरोपांबद्दल मला खेद आहे. त्यामुळे माझ्याविरोधात सुरु असलेला अब्रुनुकसानीचा खटला परत घ्यावा.'
- यासोबतच केजरीवालांनी दुसरा माफीनामा हा काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना लिहिला आहे. केजरींनी सिब्बल यांच्यावर एका टेलिकॉम कंपनीचा टॅक्स प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिब्बल यांच्या मुलाने केजरींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
- केजरींनी 19 जानेवारी रोजी गडकरींची भेट घेतली होती. तेव्हाच असा अंदाज वर्तवण्यात आला होता की कायदेशीर लढाईचा कोर्टाबाहेर सामोपचाराने तोडगा काढला जाईल. त्याच दिवशी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली होती.
काय म्हणाले होते केजरीवाल
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 2016 मध्ये पंजाब विधानसभा निवडणूक प्रचारात आक्रमक झाले होते. तत्कालिन अकाली सरकारचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे छोटे बंधू विक्रमसिंह मजीठिया यांना ड्रग्स माफिया म्हटले होते. एवढेच नाही तर पंजाबमध्ये आपचे सरकार आले तर मजीठियांची कॉलर पकडून त्यांना तुरुंगात डांबू असा इशारा केजरीवालांनी दिला होता.
- मजीठिया ड्रग्स ट्रेडमध्ये सहभागी असल्याचा आरोप केजरींनी केला होता. याशिवाय प्रकाशसिंह बादल सरकार डग्स माफियांना आणि या धंद्याला अभय देत असल्याचा आरोप केला होता.
कुमार विश्वास यांचे ट्विट
- राज्यसभेचे सदस्यत्व नाकारल्यामुळे नाराज असलेले आप नेते कुमार विश्वास यांनी केजरीवालांनी मजीठिया यांची माफी मागितल्यानंतर ट्विटरवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
- कोणाचेही नाव न घेता केलेल्या ट्विटमध्ये कुमार विश्वास म्हणाले, ''एकता बांटने में माहिर है, खुद की जड़ काटने में माहिर है, हम क्या उस शख्स पर थूकें जो खुद, थूक कर चाटने में माहिर है!''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.