आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amarnath Cave Can Be Restored Again; Order Of Peace Area Canceled By Supreme Court

अमरनाथ गुहेमध्ये पुन्हा जयघोष करण्यास मुभा;शांतता क्षेत्राचा अादेश सुप्रीम काेर्टाकडून रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगा समोर आता पुन्हा जयघोष करण्याची मुभा मिळाली आहे. अमरनाथ गुहेत शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन ) जाहीर करण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) यापूर्वी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने साेमवारी रद्दबातल ठरवला.  

 
न्यायमूर्ती मदन बी. लाेकूर अाणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने नमूद केले की, ती याचिका अमरनाथ गुहेशी संबंधितच नव्हती, त्यामुळे ‘एनजीटी’ने तिथे शांतता क्षेत्र जाहीर करायला नकाे हाेते.


तत्पूर्वी अमरनाथ श्राइन बोर्डाच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ‘वैष्णवदेवी मंदिरापर्यंत खेचर व घोड्यांना नेण्यास बंदी घालण्याच्या याचिकेवर एनजीटीने हे अादेश दिले हाेते. पवित्र गुहेत घंटी वाजवणे, प्रसाद चढवणे, मंत्राेच्चारण करणे व जयघाेष करण्यासही बंदी घातली हाेती. भाविकांना प्रसाद अाणण्यास कसे काय राेखता येईल? हा लाेकांच्या भावनेशी संबंधित विषय आहे.’

बातम्या आणखी आहेत...