आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ राज्यांत पाऊस; काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाऊस उत्तर भारतातील राज्यांत पोहोचला आहे. गुरुवारी दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, जम्मू-काश्मीर या राज्यांत पावसाळ्यातील पहिला पाऊस झाला. त्यामुळे येथे प्रचंड उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला. हवामान विभागानुसार, देशात २६ राज्यांत मान्सून पोहोचला आहे.काश्मीरमध्येही मुसळधार पावसामुळे गुरुवारी अमरनाथ यात्रा स्थगित झाली. बुधवारी रात्रीच्या पावसानंतर बालटाल व पहलगामच्या मार्गांवर घसरण झाली. यात्रा भागात ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवारी पहिला जथ्था जम्मू रवाना झाला होता. 


दिल्लीत पावसाळ्याचा पहिला पाऊस 
दिल्लीत गुरुवारी पावसाळ्यातील पहिला पाऊस झाला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २०.४ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे दिल्लीवासीयांना भीषण गर्मीपासून दिलासा मिळाला. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 


मान्सूनची स्थिती 
दक्षिण आणि पूर्व भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय : हवामान विभागानुसार, मान्सून आता दक्षिण आणि पूर्व भारताच्या सर्व राज्यांत पूर्ण सक्रिय आहे. पुढील दोन दिवसांत पूर्ण देशात सक्रिय होईल. ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणात जोरदार पाऊस होत आहे. ईशान्येच्या सर्व ७ राज्यांत व प. बंगालमध्ये मान्सून सक्रिय आहे. 


महाराष्ट्र, म. प्र., छत्तीसगडमध्ये मुसळधारचा इशारा : हवामान विभागाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत पुढील ४८ तासांसाठी इशारा जारी केला आहे. गुरुवारी अमृतसरमध्ये ११ मिमी, चंदीगडमध्ये १७ मिमी, अंबालात ९ मिमी, हिसारमध्ये २० मिमी, भिवानीत सर्वाधिक ६९ मिमी पाऊस झाला. हिमाचलमध्ये सर्वाधिक ९१ मिमी पाऊस उना येथे झाला. हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्येही पुढील २४ तासांत प्रचंड पावसाची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...