आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा प्रवास No One ते One असा, विरोधकांनी पराभव स्वीकारणे शिकावे-नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी भाजप मुख्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यावेळी नरेंद्र मोदींनी भाषणाला सुरुवात करताना  नमाजापूर्वीची अजान सुरू  झाली. त्यामुळे अजान संपेपर्यंत मोदी भाषण न करता शांत उभे होते. त्यायाआधी अमित शहा म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील दिग्विजयाचा हा रथ त्रिपुराहून कर्नाटककडे निघाला आहे. 

 

काय म्हणाले नरेंद्र मोदी..

- भाषण सुरू करताना अजान सुरू झाल्याने, अजान संपेपर्यंत शांत उभे होते, नरेंद्र मोदी..

- मोदी म्हणाले, नागरिकांनी हिंसेचे उत्तर मतदानातून दिले आहे. 

- आमच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचे जेवढे दुःख आम्हाला झाले, तेवढेत त्रिपुराच्या नागरिकांनाही झाले. 

- ज्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली..

- विजयाप्रमाणेच पराभवही मोठ्या मनाने स्वीकारता आला पाहिजे

- भाजपचा प्रवास No One ते One असा आहे

 

त्यापूर्वी, पत्रकार परिषदेत बोलताना शहा म्हणाले होते, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर पूर्वोत्तरच्या विजयाने शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान मोदींनी विकासाच्या राजकारणाला महत्त्व दिले आहे. त्याला त्रिपुराच्या जनतेने भरभरुन पाठिंबा दिला असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले. पूर्वोतर राज्यांच्या निकालानंतर अमित शहा सायंकाळी मीडियासमोर आले. पत्रकार परिषदेत त्यांनी त्रिपुराच्या जनतेचे आभार व्यक्त केले. तर तिन्ही राज्यातील कार्यकर्ते, नेते आणि प्रदेशाध्यक्षांच्या कामाचे कौतूक केले. थोड्याचवेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या मुख्यालयात येणार आहेत. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

 

त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला 60 पैकी 43 जागा मिळाल्या आहे. डाव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. पूर्वोत्तरच्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड येथील विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुुरु आहे. दुपारी 4 पर्यंत तिन्ही राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्रिपुरामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे तर नागालँडमध्ये सहकारी पक्षांच्या मदतीने सत्तेचा सोपान चढणार आहे. मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

 

काय म्हणाले अमित शहा 
- पूर्वोत्तर राज्यांमध्ये विकासाच्या नावाने फक्त जनतेची दिशाभूल झाली. मोरारजी देसाई नंतर नॉर्थ-इस्ट राज्यांच्या विकासाचा विचार करणारे मोदी पहिले पंतप्रधान असल्याचे अमित शहा म्हणाले. 
- मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर नॉर्थ-इस्टच्या जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. 
- त्रिपुरामध्ये भाजपला जवळपास 50 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले आहे. गुजरात, हिमाचल नंतर त्रिपुरा हे तिसरे राज्य राहिले आहे जिथे 40 ते 50 टक्के व्होट शेअर मिळाले आहे. 
- आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमची प्राथमिकता ही विकासाला राहील. 

 

कर्नाटक - 2019 लोकसभेचे ट्रेलर 
- अमित शहा म्हणाले, आगामी कर्नाटक विधानसभा आणि त्यानंतर होऊ घातलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे हे ट्रेलर आहे. 
- हा विजय कार्यकर्त्यांना आणि पक्षाला आगामी निवडणुकीसाठी मोठे बळ देणारा ठरणार आहे.

  

हिंदी बेल्टचा पक्ष म्हटले जात होते- अमित शहा 
- अमित शहा म्हणाले, भारतीय जनता पक्षा कधीकाळी फक्त हिंदी पट्ट्यातील पक्ष म्हटले जात होते. मात्र या विजयाने दाखवून दिले आहे की भाजप हा संपूर्ण देशाचा पक्ष होत आहे.
- आता खऱ्या अर्थाने आमचा पक्ष हा अखिल भारतीय झाला आहे. लद्दाखमध्ये भाजपचा खासदार आहे, कच्छमध्ये आमचे सरकार आणि पूर्वोत्तरमध्येही भाजप विजयी झाला आहे. 

देशाचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास  
- अमित शहा म्हणाले, देशाच्या जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. 
- डावे हे देशात कधीच उजवे ठरू शकत नाही हे देशातील प्रत्येकभागातून दाखवून दिले जात आहे. 
- लोकशाहीमध्ये सरकार कसे काम करत आहे हे मोजण्याचे काही माप असेल तर ते निवडणूक आहे आणि त्यात भाजप सातत्याने विजयी होत आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार हे यशस्वी वाटचाल करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...